पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त जिलेबी वाटप

टाइम्स 9 मराठी न्युज
प्रतिनिधी:-पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष लॉंगमार्च प्रणेते माजी खासदार जोगेंद्रजी कवाडे सर यांच्या १ एप्रिल रोजीच्या वाढदिवसानिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना जिलेबी वाटून व केक कापून साजरा करण्यात आला.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशनगर अकलूज येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवा प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी माजी खासदार जोगेंद्रजी कवाडे सर यांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान व त्यांनी आजवर केलेल्या कार्याची माहिती सांगून पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आदरणीय कवाडे सरांचा १ एप्रिल वाढदिवस हा संघर्ष दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी केक कापून माजी खासदार जोगेंद्र कवाडे सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दहा किलो जिलेबीचे वाटप करून मुलांचे तोंड गोड करण्यात आले.

यावेळी या शाळेचे मुख्याध्यापक कोरे सर, मुख्याध्यापिका श्रीमती अंगुले मॅडम,नागणे सर,मगर सर,माहिते सर,कोरबू सर गायकवाड सर केसकर सर,नागने मॅडम,शिंदे मॅडम पठाण मॅडम,जगदाळे मॅडम,कोरके मॅडम,काझी मॅडम,नाचणे मॅडम,थोरात मॅडम,जाधव मॅडम यांचेसह पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुकाध्यक्ष सचिन कांबळे,तालुका संघटक पांडुरंग चव्हाण,तालुका खजिनदार विश्वास उगाडे,युवक तालुका संपर्कप्रमुख शिवम गायकवाड,अकलूज शहर संपर्कप्रमुख शिवाजी खडतरे, सचिव साजिद बागवान,राजू बागवान,जावेद शेख यांचेसह या शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.



