पुरंदावडे येथे भक्तिमय वातावरणात रंगणार श्री रेणुका माता देवीची यात्रा.
माळशिरस प्रतिनिधी महेश मोहिते
पुरंदावडे ता. माळशिरस येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री रेणुका माता यात्रेचे आयोजन दि. ११/१२/२०२४ ते दि. १३/१२/२०२४ या तीन दिवशी करण्यात आले आहे.
बुधवारी दि. ११/१२/२०२४ रोजी श्री रेणुका माताला साडी चोळी करून यात्रेस प्रारंभ होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी ४ ते ५ वा. व रात्री ७ ते १० वा. नाळेमळा येथे माहेरघरी कार्यक्रम संपन्न होणार आहे.
गुरुवार दि. १२/१२/२०२४ रोजी गंध लिंब, दुपारचा महानैवेद्य व करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.शुक्रवार दि. १३/१२/२०२४ रोजी गावातून सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत छबिना व ४ वाजता होमाचा (किच) कार्यक्रम होणार आहे.
तरी पुरंदावडे व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रेणुका माता देवीचे पुजारी जगूबाई बाजीराव मोहिते, शिवाजी बाजीराव मोहिते, दादासो शिवाजी मोहिते, आप्पासाहेब शिवाजी मोहिते, आदित्य दादासाहेब मोहिते व समस्त ग्रामस्थ पुरंदावडे यांच्यावतीने करण्यात आले आहे.