शरदचंद्र पवार साहेब आणि “किंगमेकर” बाळदादा यांच्या वाढदिवसा निमित्त अकलूज येथे मोफत डोळे तपासणी शिबीर संपन्न…
🎯 अकलूजच्या “सहायता वेलफेअर फाऊंडेशन” ने केले आयोजन…
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब आणि माळशिरस तालुक्याचे “किंगमेकर” जयसिंह मोहिते-पाटील उर्फ बाळदादा यांच्या वाढदिवसानिमित्त “सहायता वेलफेअर फाऊंडेशन” यांच्यावतीने अकलूज येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालया मध्ये मोफत डोळे तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते…
या वेळी अकलूज आणि परिसरातील जवळ जवळ १४३ नागरिकांची मोफत डोळे तपासणी करण्यात आल्याची माहिती सदरच्या शिबिराचे आयोजन प्रमुख आणि “सहायता वेलफेअर फाऊंडेशन” चे मोहसीन शेख यांनी दिली…
सदर शिबीरा प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाच्या डाॅ धोत्रे मॅडम,डाॅ चव्हाण,मोरे साहेब,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सुरेश गंभीरे,पत्रकार नौशाद मुलाणी,पत्रकार गणेश जाधव आदीं उपस्थित मान्यवरांचा सत्कार “सहायता वेलफेअर फाऊंडेशन” कडून करण्यात आला.
अकलूज शहर आणि परिसरातून डोळे व मोतीबिंदू तपासणी शिबिरातील १४३ नागरिकांतून एकुण ४६ नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती हि “सहायता वेलफेअर फाऊंडेशन” चे अध्यक्ष मोहसिन शेख यांच्याकडून देण्यात आली…
हा शिबिर यशस्वी रित्या पार पडण्यासाठी फाऊंडेशन उपाध्यक्ष बाबाभाई सय्यद,सचिव जाकीर शेख,सहसचिव समिर काझी,कार्याध्यक्ष फारूक शेख,इम्रान बागवान,बापू लोंढे,आयान तांबोळी,शोएब बागवान आदींनी अथक परिश्रम घेतले…