महाराष्ट्र

माळीनगर येथे कृषी कन्यांकडून शेती विषयक ॲपबाबत माहिती

प्रतिनिधी- रियाज मुलाणी
मो.9921500780

माळीनगर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित, रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज यांचेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांसाठी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम २०२४-२५ अंतर्गत कृषी सल्ला केंद्राने आधुनिक शेतीसाठी मोबाईल ॲप्लिकेशन वापर करण्याचा सल्ला देवून माहिती देण्यात आली.

या प्रात्यक्षिकेच्या आयोजनासाठी शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जी. नलवडे,कार्यक्रम समन्वय प्राध्यापक एस. एम.एकतपुरे,कार्यक्रमाधिकारी प्रा. एम .एम .चंदनकर आणि प्रा .एच.व्ही .कल्याणी यांच्या मार्गदर्शनानुसार कृषी कन्या प्रतीक्षा हेगडे,प्रतीक्षा बनसोडे, सोनाली गायकवाड , कोमल लाड,जिजाऊ बर्डे,ईशा घोगरे, स्नेहल तांबोळकर,प्राची जाधव, प्रणाली यादव यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले.

माळीनगर या परिसरात मोबाईलच्या अनुषंगाने शेतकरी वर्गाला कृषिकन्या यांच्याकडून शेतीविषयक सल्ला देण्यात आला.ऍग्रो नेटवर्क हे अँड्रॉइड आधारित मोबाईल ॲप्लिकेशन आहे ज्याद्वारे नोंदणीकृत शेतकरी कृषी संबंधित माहिती जसे की हवामान अंदाज ,बाजार दर ,कृषी सल्लागार तसेच कृषी संबंधित अपडेटेड बातम्या मराठी भाषेतून मिळू शकतात.नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे वेळोवेळी एप्लीकेशन अपडेट केले जाऊ शकते असे मार्गदर्शन केले.यावेळी कृषी कन्या व माळीनगर मधील ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button