“माझी वसुंधरा” योजने अंतर्गत अकलूज येथील मुस्लिम समाजाच्या जुन्या दफनभूमीची साफ सफाई…
🎯 अकलूजच्या बागवान समाजाने केलेल्या मागणीला यश आल्याने सबंध मुस्लिम समाजात आनंदाचे वातावरण…
आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान अकलूज येथील बागवान समाजाने “युवा नेते” शिवतेजसिंह मोहिते पाटील यांना माळीनगर रोड वरील जुन्या मुस्लिम दफनभूमी ची साफ सफाई करण्यात यावी असे निवेदन दिले होते…
आज त्याच अनुषंगाने अकलूज नगर परिषदेने मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारच्या “माझी वसुंधरा” या योजने अंतर्गत अकलूज येथील जुन्या मुस्लिम दफनभुमीच्या साफ सफाईला सुरुवात केली…
गेली अनेक वर्षे संबंधित दफनभूमीची साफ सफाई न झाल्याने काटेरी झाडे झुडपे आणि गवत भरपूर प्रमाणात वाढले होते,या वेळी अकलूज नगर परिषदे तर्फे एक जेसीबी,ट्रॅक्टर ट्रॉली आणि सफाई कामगार यांच्या साहाय्याने साफ सफाईला सुरुवात करण्यात आल्याची माहिती टाइम्स 9 न्यूज च्या सुत्रांनी दिली…
बागवान समाजाने निवेदन देत गेल्या अनेक वर्षापासूनची दफनभूमी साफसफाईची प्रलंबित असणारी मागणी पूर्णत्वास गेल्याने अकलूज येथील सबंध मुस्लिम समाजाने “युवा नेते” शिवतेजसिंह मोहिते पाटील आणि अकलूज नगर परिषदचे मुख्याधिकारी दयानंद गोरे साहेब यांचे आभार मानले…