महाराष्ट्र

बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणा-याच्या करमाळा पोलिसांनी आवळल्या मुसक्या; चोरीच्या दोन गुन्हयांची उकल करमाळा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

करमाळा बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील (करमाळा उपविभाग) यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस सूचना दिल्या होत्या. त्यानुसार करमाळा पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने कर्जत तालुक्यातील एकाला पाळत ठेवून अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती देताना पो.नि. घुगे यांनी सांगितले की, दि. २२/११/२४ रोजी दुपारी ०२/३० वाजण्याच्या सुमारास आळजापूर (ता.करमाळा) येथील शितल बिभिषण रोडे या करमाळा येथून गावी जाण्यासाठी बसस्थानकावर थांबल्या असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठन, ९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस, ९ ग्रॅम वजनाचे फुले-झुबे व ८ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन असे एकूण २,३०,०००/- रु. किंमतीचे दागिने चोरी केले होते.

तसेच दि.२४/११/२४ रोजी दुपारी ०२:०० वाजण्याच्या सुमारास छाया बंडेश पांढरे (वय-७५, रा. सोलापूर) या करमाळा ते कुईवाडी बसने प्रवास करीत असताना अज्ञाताने गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या उजव्या हातातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची पाटली हातातुन चोरी केली होती. या दोन्ही घटनांबाबत करमाळा पोलिसांत गुन्हे दाखल आहेत.

करमाळा गुन्हे प्रकटीकरण पथक हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या मागावर असताना गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचे गुन्हे हे आरोपी सोमनाथ दिलीप काळे (वय-२३ वर्षे, रा. थेरगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर) याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर करमाळा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारा मार्फत सदर आरोपी हा मौजे थेरगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर येथे असल्याची माहीती मिळाली. या माहीतीच्या आधारे तपास पथकाने थेरगाव येथे दोन दिवस आरोपीचा माग घेत दि.३० /११/२४ रोजी आरोपीस पकडून अटक केली.

यानंतर आरोपीस करमाळा न्यायालयात उभे केले असता त्याला ६ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. तपासादरम्यान आरोपीकडे सदर गुन्ह्यांतील चोरी केलेल्या ऐवजाबाबत चौकशी केली असता आरोपीने चोरलेल्या ऐवजापैकी रोडे यांच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यातील २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठन व ९ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलस असे एकुण १,४५,०००/- रु. किंमतीचे दागिने तसेच पांढरे यांच्या फिर्यादीवरून दाखल गुन्हयातील अंदाजे ५०,०००/- रु. किंमतीची १५ ग्रॅम वजनाची एक सोन्याची पाटली असे एकुण १,९५,०००/- रु. किंमतीचे सोन्याचे दागिने काढुन दिले आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.ना. वैभव ठेंगल व पो. हवा. अजित उबाळे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, करमाळा पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ अजित उबाळे, पोना वैभव ठेंगल, पोना मनिष पवार, पोकॉ तौफीक काझी पोकॉ ज्ञानेश्वर बांगडे, पोकॉ गणेश शिंदे, पोकॉ रविराज गटकुळ, पोकॉ सोमनाथ जगताप तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोना व्यंकटेश मोरे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button