एटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्या कल्याण येथील टोळीला जेरबंद करण्यात पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या पथकाला यश
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्ह्यातील एक वयोवृद्ध इसम पालघर केळवा-माहीम येथील एटीएम मधून आपले पैसे काढण्यासाठी गेले असताना त्यांच्या एटीएमची अदलाबदली करून त्यांच्या खात्यातील पैसे काढून घेणाऱ्या तीन आरोपींना पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या पथकाने टिटवाळा येथून त्यांना अटक करून जेरबंद केले आहे.
पालघर केळवा माहीम येथे राहणारे भगवान नामदेव हातेकर वय वर्ष (67) हे वयोवृद्ध इसम शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी केळवा-माहीम येथील बँक ऑफ इंडिया या बँकेच्या एटीएम मध्ये आपल्या खात्यातून पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी येथे उपस्थित असलेल्या तीन अज्ञात इसमानी आम्ही तुम्हाला मदत करतो असे सांगून त्यांचे एटीएम ताब्यात घेऊन त्या एटीएमची अदलाबदली केली.
यानंतर काही तासाने त्यांच्या खात्यातील 50 हजार रुपयांची रक्कम वजा झाल्याने त्यांनी याबाबत पालघर पोलिसात तक्रार दाखल केली होती. या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरले यांनी या गुन्ह्याच्या तपासाची जबाबदारी पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्याकडे सोपवली होती.
पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहित खोत, पोलीस उपनिरीक्षक गणपत सुळे,पोलीस निरीक्षक वानखडे या पथकाने या गुन्ह्यातील आरोपी किस्मत शेख वय वर्ष( 27), अस्मत अली शेख(32) आणि हरेश राहुल प्रधान उर्फ दैत्या (21) सर्व राहणार ( कल्याण बनेली ) या तीन आरोपींना त्यांच्या ताब्यातील होंडा सिटी कारसह 30 हजार रुपयांच्या रोख रकमेसह टिटवाळा येथून अटक करून जेरबंद केले आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अपर जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक नरले यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक गणपत सुळे, पोलीस उपनिरीक्षक रोहित खोत,पोलीस उपनिरीक्षक वानखेडे या पथकाने केली आहे.