महाराष्ट्र बागबान वर्किंग कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचा अकलूज येथे भव्य सत्कार…
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
अकलूज येथील प्रसिद्ध हॉटेल उद्योजक हाजी जमीरभाई बागवान चौधरी यांनी आज आपल्या “हॉटेल अमीर” येथे महाराष्ट्र बागबान वर्किंग कमिटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा यथोचित सन्मान केला…
महाराष्ट्र बागबान वर्किंग कमिटी वर निवड झालेले सोलापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आमीर मोहोळकर आणि अकलूज शहर अध्यक्ष मोहसीन बागवान यांचा विशेष सत्कार “समाजभूषण” शकुर महंमद बागवान उर्फ भैय्या माढेकर यांच्या हस्ते करण्यात आला तर माळशिरस तालुका संघटक ताहेर मोहोळकर,माळशिरस तालुका कार्याध्यक्ष हसन माढेकर,माळशिरस तालुका उपाध्यक्ष फरीद बागवान,अकलूज शहर अध्यक्ष मोहसीन बागवान आणि अकलूज शहर उपाध्यक्ष साबीर बागवान यांचा सत्कार हाजी जमीरभाई बागवान चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला…
या वेळी बोलताना “समाजभूषण” आणि “भावी नगरसेवक” भैय्या माढेकर असे म्हणाले की,महाराष्ट्र बागबान वर्किंग कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत भरीव अशी कामगिरी पार पाडावी आणि अकलूज च्या बागवान समाजाचे नांव सबंध महाराष्ट्रात अजरामर करावे अशा शुभेच्छा दिल्या…
या वेळी महाराष्ट्र बागवान वर्किंग कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना मुस्लिम समाजाचे रफिकभाई पठाण,मनोज पोटे (सावकार),शिवा साठे,जावेद (बाबा) तांबोळी,गणेश साठे यांच्या सह “भावी नगरसेवक” जुल्कर शेख,छोटा जावेद बागवान,वाजीद शेख आणि टाइम्स 9 चे संपादक नौशाद मुलाणी यांनी हि शुभेच्छा दिल्या…
सदरचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज घटकातील सर्वच युवकांनी प्रयत्न केले…