महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी महायुतीचे देवेंद्र फडवणीस तर उपमुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे आणि अजित दादा पवार
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
मी पुन्हा येईल असा निर्धार व्यक्त केलेले आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष ठरलेले भाजपचे चाणक्य राजकीय नीतीने अवगत असलेले विक्रमादित्य नेते देवेंद्र सरिता गंगाधरराव फडवणीस यांनी अखेर तिसऱ्यांदा मुंबई आझाद मैदानावर गुरुवार दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याचबरोबर एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे आणि अजित आशाताई अनंतराव पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
महाराष्ट्र राज्याचे 24 वे विद्यमान राज्यपाल सीपी राधाकृष्ण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबई आझाद मैदानावर हा भव्य शपथविधी सोहळा पार पडला.
महाराष्ट्र राज्याचे 21 वे महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र सरिता गंगाधरराव फडवणीस यांनी मुख्यमंत्री या पदाची तिसऱ्यांदा गुरुवार दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी शपथ घेतली आहे.
यावेळी विविध राज्यांचे मुख्यमंत्री, दिग्गज नेते मंडळी, सिनेस्टार अभिनेते तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांनी या भव्य सोहळ्यासाठी वर्णी लावली होती.