अकलूज येथील एसटी आगारात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

उपसंपादक——– हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
अकलूज येथील एसटी आगारात शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील उपस्थित होते प्रारंभी शिवतेज सिंह मोहिते पाटील व किशोर सिंह माने पाटील यांच्या हस्ते छत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
याप्रसंगी वाहतूक निरीक्षक- अनिल दळवी ,कार्यशाळा अधीक्षक -सूर्यवंशी ,सहाय्यक वाहतूक निरीक्षक- शिंदे ,वाहतूक नियंत्रक- संजय पिसे ,! संजय कुलथे ,राजू गोसावी, हेड मेकॅनिक -आबा राऊत ,आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी बाळासाहेब सूर्यवंशी यांचे हस्ते शिवतेजसिंह मोहिते पाटील व किशोर सिंह माने पाटील यांचा सन्मान करण्यात आला, तसेच आबासाहेब पठाडे जीवन (बापू) सराटे, महादेव सरवदे ,यांच्या हस्ते उपस्थित मान्यवराचा सत्कार करण्यात आला
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सिताराम ढाणे, विलास निंबाळकर ,अनिल गायकवाड (मेजर) रणजित माने, अनंता माने ,चंदू रंधवे ,विजय रणवरे, नवनाथ चव्हाण, वैजनाथ भोसले, राया कांबळे ,कोथमीरे, आणि आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन चंद्रशेखर गायकवाड यांनी केले तर नवनाथ चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.