शहर
” मी आंबेडकरवादी ” सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य.च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

उपसंपादक—— हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
आंबेडकरवादी” सामाजिक संघटनेच्या वतीने संघटनेच्या संपर्क कार्यालय नऊदारे ( जंक्शन-वालचंदनगर रोड )येथे आज रविवार दि. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन केले.

यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे, संघटनेचे सचिव अनिल केंगार, राजेश बनसोडे, सुमित घोडके, विकी काटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.