फीनिक्स इंग्लिश मिडीयम स्कूल 25/4लवंग येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा.

उपसंपादक—— हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
25/4 लवंग येथील फिनिक्स इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली असून या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती.शिवाजी महाराज, माँ जिजाऊ व मावळ्यांचे पोशाख परिधान करून आमचे आदर्श शिवाजी महाराज ,जय जिजाऊ जय शिवराय आशा घोषणा देत गावातून प्रभातफेरी काढली व छ.शिवाजी महाराज यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त करताना फिनिक्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालिका नूर जहान शेख म्हणाल्या की छत्रपती शिवाजी महाराज केवळ मराठ्यांचे राजे आहेत

असा विचार लोकांनी मनातून काढून टाका महाराजांनी कधीच जात पात मानली नाही राज्यातील अठरापगड जातींना एकत्र आणून स्वराज्य रयतेचे राज्य निर्माण केले महाराजांचे वैर हे शासनकर्त्याशी होते मुस्लिमांशी किंवा कोणत्याही धर्माची कधीच नव्हते महाराजांच्या या उत्तुंग विचारसरणीला जातीच्या चौकटीतून पाहणे म्हणजे महाराजांच्या विचाराचा आपण केलेला पराभव नाही का?

या प्रसंगी छत्रपती कला क्रीडा मंडळ चे सर्व सदस्य ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान जगताप ,अशोक कदम (मा. चेअरमन विकास सोसायटी तांबवे ,) अस्लम खान तांबवे,नौशाद शेख गणेशगाव,रियाज पठाण गणेशगाव मारुती बलभीम चव्हाण, नवनाथ मांडवे तांबवे)रणजित चव्हाणआदी मान्यवर उपस्थित होते