महाराष्ट्र

बकरी ईद व आषाढी एकादशी निमित्त मुस्लिम समाजाची बैठक संपन्न! बकरी ईद दिवशी कुर्बानी न करण्याचा अकलूज मुस्लिम समाजाचा निर्णय

उपसंपादक ——-हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

हिंदू समाज बांधवांची आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने हिंदू समाज बांधवांचे आदर्श स्थान व तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील पांडुरंगाची सर्वात मोठी एकादशी असल्याने दिनांक 29 जून 2023 रोजी बकरी ईद निमित्त कुर्बानी न करण्याच्या निर्णय अकलूज शहर मुस्लिम समाजाने घेतला असून 29 जून रोजी होणारी कुर्बानी स्थगित करून 30 जून व 1 जुलै रोजी मुस्लिम समाजाच्या वतीने कुर्बानी करण्यात येणार आहे या संदर्भात मंगळवार दिनांक 27 जून 2023 रोजी मदिना मस्जिद काझी गल्ली अकलूज येथे मुस्लिम समाजाची बैठक संपन्न झाली या बैठकीस अकलूज पोलीस स्टेशनचे मनोज शिंदे व पिंगळे तसेच अकलूज आणि पंचक्रोशीतील बहुसंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते

विशेषतः अकलूज आणि परिसरातील सर्व मुस्लिम बांधवांना सूचना देण्यात येते की बकरी ईद ची नमाज गुरुवार दिनांक 29 जून रोजी सकाळी 8/30 वाजता अकलूज येथील ईदगाह मैदानावर पठण करण्यात येणार असून मदिना मस्जिदचे पेश इमाम जनाब मौलाना मोहम्मद आलम रजवी हे खुत्बा,प्रवचन व नमाज पठण करणार आहेत तरी सर्व मुस्लिम बांधवांनी बकरी ईद च्या नमाजसाठी सकाळी 8 वाजता ईदगाह मैदानावर वेळेवर उपस्थित राहावे असेही आवाहन करण्यात आले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button