शहर

मुंबई आझाद मैदान येथे मातंग समाजाच्या वतीने विविध मागण्या संदर्भात आंदोलन…..सौ.सारिका कांबळे जिल्हाध्यक्ष.

प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद

धाराशिव जिल्ह्यातील मातंग समाजाच्या वतीने 22 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबई येथील आझाद मैदान येथे मातंग समाजाच्या वतीने होत असलेल्या आंदोलनास हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन लहूजी शक्ती सेनेच्या जिल्हाध्यक्षा सौ.सारिका कांबळे यांनी केले आहे.गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाजाच्या विविध मागण्या शासन दरबारी धूळ खात पडल्या आहेत.त्यामुळे 22 फेब्रुवारी रोजी जवाब दो आंदोलन होणार असून या आंदोलनाला महाराष्ट्र राज्यातून मातंग समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे.

अनुसूचित जातीचे अ ब क ड नुसार वर्गीकरण करण्यात यावे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे संशोधन आटीॅ स्थापन करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी जवाब दो आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच धाराशिव जिल्ह्याच्या वतीने सकल मातंग समाज बंधू आणि भगिनीने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लहुजी शक्ती सेनेच्या जिल्हाध्यक्षा सौ. सारिका कांबळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button