शहर

बार्टीच्या विभागप्रमुख पदी डॉ.सत्येंद्र चव्हाण

डी एस गायकवाड
अकलूज

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कोर्टी येथील डॉ. सत्येंद्र चव्हाण यांची बार्टीच्या विभाग प्रमुख पदी नुकतीच निवड झाली आहे. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

पशुसंवर्धन विभागात राजपत्रित अधिकारी म्हणून २४ वर्षे सेवा बजावलेले डॉ सत्येंद्र चव्हाण यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे संस्थेत विभागप्रमुख विस्तार व सेवा या पदावर महाराष्ट्र शासनाने पुन्हा नियुक्ती केली आहे . डॉ बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती संभाजीराजे व भिमा कोरेगाव युध्दाचे डॉ चव्हाण हे अभ्यासक असुन ते उतम लेखक विचारवंत व वक्ते आहेत . विस्तार सेवा विभागात डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे ऐतिहासिक स्मारके , निर्माण केलेली उपकेंद्रे याची देखभाल करणे , जतन करणे तसेच प्रकाशन व प्रसिद्धी विभाग , तांत्रिक विभागाने बांधकाम विषयक करावयाची कामे इत्यादी या विभागाच्या अधिनिस्त आहे . राज्यातील समतादुत विभाग हा बार्टी मधील महत्वपूर्ण विभाग असून संस्थेच्या योजना जनतेपर्यंत,तळागाळात पोहोचवण्यासाठी नावलौकिक तसेच अज्ञातवासातील बहुजन समाजातील नायक महानायकचा इतिहास हा पुस्तक रुपाने संपादित करण्याचा मानस डॉ चव्हाण यांनी व्यक्त केला.त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ग्रामीण भागातून येऊन अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी ही उंची गाठली असून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.
टाइम्स 9 मराठी न्युज च्या वतीने डाॕ.सत्येंन्द्र चव्हाण यांचे हर्दिक आभिनंदन.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button