महाराष्ट्र

२० नोव्हें २०२४ रोजी सर्व विधानसभा मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

सामान्य प्रशासन विभाग हुतात्मा राजगुरु चौक,मादाम कामा रोड,मंत्रालय,मुंबई ४०००३२,दिनांक ३० ऑक्टोबर,२०२४.

अधिसूचना

क्रमांक सार्वसु -१०२४/प्र.क्र.१३६ /जपुक (२९). परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१चा २६) च्या कलम २५ नुसार व भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३९/१/६८-जेयुडीएल-तीन, दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून,महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका-२०२४ च्या अनुषंगाने बुधवार दिनांक २० नोव्हेंबर, २०२४ रोजी सर्व विधानसभा मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करीत आहे.

२. मंत्रालयातील सर्व विभागांना विनंती करण्यात येते की,त्यांनी सदरची अधिसूचना त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील शासकीय,निमशासकीय कार्यालये,महामंडळे/मंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणावी. तसेच केंद्र शासनाची शासकीय कार्यालये,निमशासकीय कार्यालये,सार्वजनिक उपक्रम,बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील…

३. माहिती व जनसंपर्क विभाग यांनी सदर अधिसूचना वृत्तपत्र व इतर प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध करावी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button