महाराष्ट्र

आधी लगीन कोंढाण्याचे मगच रायबाचे…!

🎯 माळशिरस नावाचा “कोंढाणा” काबीज करण्यासाठी मोहिते पाटील आणि जानकर गटाचे अनेक “तानाजी मालुसरे” लागले कामाला…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

होय,अगदी खरे बोलायचे झाल्यास कधी नव्हे ते यंदाच्या वेळी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका हे एका टप्प्यात पार पडत असुन नेहमी प्रमाणेच अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून असलेल्या माळशिरस विधानसभा मतदार संघा कडे सबंध राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे…

एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळख असणाऱ्या मोहिते पाटील आणि जानकर गटाने लोकसभा निवडणुकी पासुन आपले “मनोमिलन” करून माळशिरस विधानसभा कसल्याही परिस्थितीत राखायची असा चंगच बांधला आहे आणि ते राखतील हि अशी सद्य स्थिती तर जरूर आहे…

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी राम सातपुते यांना परत एकदा माळशिरस विधानसभेची उमेदवारी भाजपा कडून देत राम सातपुते यांना सहा महिन्यांत दुसऱ्यांदा पराभवाची चव चाखायला माळशिरस च्या मोहिमेवर पाठविले आहे असे सध्या तरी वाटत आहे…

कारण,माळशिरस विधानसभा मतदार संघ हा मोहिते पाटील आणि जानकर यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनीच प्रतिष्ठेचा केला असुन “आधी लगीन कोंढाण्याचे (माळशिरस) मगच रायबाचे” अशी भीष्म प्रतिज्ञाच मोहिते पाटील आणि जानकर यांच्या कार्यकर्त्यांनी घेतल्या मुळे भाजपा चा “राम” अडचणीत आला आहे…

सोलापूर जिल्हयातील 11 मतदार संघापैकी माळशिरस विधानसभा मतदार संघात सर्वात कमी उमेदवार निवडणुक रिंगणात असुन येथे 12 उमेदवार निवडणुक लढ्वत आहेत मात्र खरी लढत हि राम सातपुते आणि उत्तमराव जानकर यांच्या मध्येच होणार असल्याचे चित्र दिसत आहे…

अशातच गेल्या दोन चार दिवसांमध्ये राम सातपुते यांची वेळापूर येथील एका प्रचार सभेत बोलताना मुस्लिम समाजावर “जीभ” घसरली आणि माळशिरस तालुक्यात असणारी हिंदु मुस्लिम “एकता” भंग करण्याचा प्रयत्न राम सातपुते यांनी केल्यामुळे ते बॅक फूटवर गेले,जी चूक राम सातपुते यांनी लोकसभा निवडणुकी वेळी सोलापूर येथे केली होती ती चूक मात्र उत्तमराव जानकर यांच्या पथ्यावर पडणार आहे अशी चिन्हे दिसू लागली आहेत…

माळशिरस विधानसभा निवडणुकी मध्ये पराभव समोर दिसताच राम सातपुते यांनी काढलेले भाजपा “अस्त्र” सपशेल फेल गेल्याचे पहायला मिळाले आणि हो ती चूक राम सातपुते यांनी नंतरच्या प्रचार सभेत सुधारल्याचे हि पहायला मिळाले…

याला सुध्दा एक कारण आहे ते असे की,माळशिरस तालुक्यात आत्ता पर्यंत च्या इतिहासात जातीय समीकरणांची जुळवाजुळव करून कधी निवडणुका झाल्या नाहीत,कारण या तालुक्यांमध्ये पहिल्या पासुन मोहिते पाटील आणि त्यांचा विरोधी गट अशाच निवडणुका होत होत्या परंतु राम सातपुते यांनी अशी चूक करून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्याचे काम केले आहे…

देवेंद्र फडणवीस यांनी राम सातपुते यांना वाघ समजून जरी माळशिरस च्या मोहिमेवर पाठविले असले तरी इथे मोहिते पाटील यांच्या वतीने एक उत्तम “सिंह” निवडणुक रिंगणात उतरला असुन जातीय वादाची बीजे पेरणाऱ्या राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यातील अशा अनेक “सिंहा” पासुन सावधच रहावे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही…

“आधी लगीन कोंढाण्याचे म्हणजे माळशिरस” हि गोष्ट तर अधोरेखित झाली असुन “मग लग्न कुठल्या रायबाचे”…? असा प्रश्न टाइम्स 9 च्या वाचकांना जरुर पडला असेल ते आपणांस 23 नोव्हेंबर ला दुपार पर्यंत जरूर कळेल कारण गाडी क्रमांक 1552 पार्सल घेऊन जाण्यासाठी सज्ज असेल…

एवढे मात्र तितकेच खरे…

तूर्तास इतकेच…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button