लोकशाहीर आत्माराम पाटील यांचा जन्मशताब्दी महोत्सव सांगता समारंभ सफाळे देवभूमी येथे संपन्न
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक: 7030516640
संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या चळवळीचे अग्रणी लोकशाहीर आत्माराम पाटील यांचा जन्मशताब्दी महोत्सवाची सांगता समारंभ सफाळे देवभूमी सभागृहात शनिवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी पार पडला.
हा कार्यक्रम लोकशाहिर आत्माराम पाटील कला प्रबोधिनी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
लोकशाहीराच्या प्रतिमेला उदय पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले. यावेळी आत्मारामायणाचे पुस्तकही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. शाहिर गंगाराम घरत यांनी आम्ही जंगलचे राजे वनवासी व इतर शाहिरी सांगुन आत्माराम पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
शाहीर आत्माराम पाटील यांच्या जन्मदिवसाच्या औचित्य साधून शताब्दी वर्षाची सांगता कार्यक्रम असल्याने या वर्षात जाहीर कार्यक्रम घेऊन शाहिरांच्या नावे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शताब्दी वर्ष साजरे करत असताना स्मारकासाठी जागा मिळविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला पाहिजे असे गंगाराम घरत यांनी सांगितले.या कामी कपासे ग्रामस्थांनी विशेष पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
भालचंद्र पाटील यांनी शाहिरांबद्दल व त्यांच्या कार्याबद्दल विशेष माहिती सांगितली. त्यानंतर शाहिर यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन अनेकांनी मनोगत व्यक्त केले. लोकशाहीर आत्माराम पाटील यांचा वारसा जपण्याचे काम सुरू झाले असल्याचे प्रमुख पाहुणे राजन देसाई यांनी सांगितले. शेतात राबतो तो शेतकरी आहे. समाजामध्ये मुलांना बक्षिसे देऊन चालणार नाही तर शाहिर यांच्या पुस्तकाचे वितरण करुन ख-या अर्थाने समाजप्रबोधन घडेल. शाळांमध्ये शाहिर यांच्या जीवनावर आधारित स्पर्धा घेऊन मुलांना पारितोषिक देण्यात यावे. असे आवाहनही करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते उदय पाटील, प्रमुख पाहुणे राजन देसाई, विशेष अतिथी यदुनाथ पाटील, गंगाराम घरत, विनोद पाटील, संग्राम पाटील, संतोष पाटील, भालचंद्र पाटील , लोकशाहीर आत्माराम पाटील कला प्रबोधिनीचे पदाधिकारी व विश्वस्त उपस्थित होते.