शहर

महायुतीच्या मुंबई दहिसर उमेदवार मनीषाताई चौधरी यांच्या प्रचाराला नागरिकांची जत्रा..

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक. 7030516640

153 मुंबई दहिसर विधानसभा महायुतीच्या उमेदवार मनीषा ताई चौधरी मुंबई बोरीवली दहिसर भागातील एक प्रख्यात समाजसेविका यांच्या प्रचाराची रॅली शनिवार दिनांक 9 नोव्हेंबर 2024 रोजी विठ्ठल मंदिर ते न्यू शेल्टर मायकलवाडी अशी काढण्यात आली होती .

यावेळी मनीषा ताई चौधरी यांनी सर्वसामान्य नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊन भविष्यात त्या समस्या सोडवण्यासाठी मी खंबीर आहे.अशी हमी देऊन नागरिकांना आश्वासन दिले.

यावेळी या भागातील सर्वसामान्य नागरिकांनी मनीषाताई चौधरी यांना भेटण्यासाठी व त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी जत्रा जमा केली होती.

यावेळी या प्रचार रॅली दरम्यान गुजरातचे खासदार मितेश भाई पटेल(बकाभाई), शिवसेना प्रवक्ता शितल मुकेश म्हात्रे, माजी नगरसेवक जगदीश करणाशंकर ओझा, माजी नगरसेवक हरित छेडा, माजी नगरसेवक जितेंद्र पटेल, उत्तरे मुंबई महिला मोर्चा अध्यक्ष योगिता पाटील, वार्ड अध्यक्ष गिरीश खराडे, युवा मोर्चा आघाडी आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button