उध्दव ठाकरे यांची पञकार परिषद. लोकशाही संपली हे मोदींनी लाल किल्ल्यावरुन सांगावं – उद्धव ठाकरे

उपसंपादक —– हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448
ता १७ फेब्रुवारी शिवसेना आणि धनुष्यबाण निसटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. लोकशाही संपली हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन सांगावं, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी दिली. त्याशिवाय निवडणूक आयोगाच्या निर्णायाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेय._
निवडणूक आयोगाचा हा निकाल लोकशाहीच्या दृष्टीनं अतिशय घातक आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमोहत्सवी वर्षाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन 75 वर्षाचं स्वातंत्र्य संपलेलं आहे, असे जाहीर करावे. लोकशाहीला आदरांजली वाहून बेबंदशाहीला सुरुवात झाल्याचं मोदींनी जाहीर करावे.
न्यायव्यवस्था दबावाखाली कशी येईल, याची अनेक उदाहरणं पाहिली आहेत. आजचा हा निर्णय अत्यंत अनेपेक्षित आहे, कारण जवळपास सहा महिने सर्वोच्च न्यायालयत सुरु आहे. त्याची आता सलग सुनावणी सुरु होईल. तो निकाल लागेल तोपर्यंत निवडणूक आयोगानं निर्णय देऊ नये…
कदाचित एक दोन महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका लागतील. त्यांना मुंबईला भिकेला लावून दिल्लीश्वरांच्या दारात उभे करायचं आहे. शिवसेना लेचीपेची नव्हती, असे उद्धव ठाकरे म्हणाले
निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात लवकरात लवकर सुप्रीम कोर्टात जाणार आहे. नामर्द कितीही मातला तरी मर्द होऊ शकत नाही. राजमान्यता मिळाली तरी चोर हा चोरच असतो. चोराला चोरी पचणार नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे यंत्रणांचा वापर करून जेवढा आमच्यावर अन्याय कराल त्याचा बदला महाराष्ट्रातील जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. कोर्टातील निकालार्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देणं चुकीचं आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आले. लोकशाहीचं वस्त्रहरण होत असलेलं आम्ही खपवून घेणार नाही. अनेक घटना तज्ज्ञांनी सांगितलं आहे की 16 आमदार अपात्र ठरतील परंतु न्यायालयाच्या निकाला आधीच हा निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.



