खेळांतून मुलांना समता, शिस्त, खिलाडूवृत्ती निर्माण होते – मुख्याध्यापक अमोल फुले

अकलूज प्रतिनिधी तात्यासाहेब काटकर
अकलूज प्रतिनिधी – क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत पुणे विभागीय शालेय क्रीडा स्पर्धा पुणे येथे संपन्न झाल्या. त्यामध्ये अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाने १७ वर्षे मुले यांनी ४ x१०० मी. रिले स्पर्धेत प्रथम क्रमांकाने अर्थव शेळके, सुयेश झंजे, अर्जुन शिराळ, सुजित रास्ते व सोहम चव्हाण या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून चंद्रपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सदर विद्यार्थ्यांनचा सत्कार शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सुभाष दळवी सर, मुख्याध्यापक अमोल फुले यांच्या हस्ते संपन्न झाला. खेळाने माणसाचे शरीर सुदृढ राहते. किंबहुना त्याला इतर कामे करण्यासाठी या खेळांतून नवी ऊर्जा प्राप्त होत असते. पण हल्लीच्या युगात माहिती आणि तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केलेली आहे की, विविध प्रकारचे खेळ आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून सहज उपलब्ध होतात. त्यात क्रिकेटचाही अपवाद नाही. पण या खेळांनी खरोखरच आपल्याला आनंद प्राप्त होतो का? तर नाही. मैदानावरील खेळांमुळे बालकांचे शरीर सदृढ होते व मन निरोगी राहते, याचीही योग्य ती जाणीव निर्माण झालेली आहे. खेळांतून मुलांना समता, शिस्त, खिलाडूवृत्ती वगैरे गोष्टींचा लाभ होत असतो असे मत मुख्याध्यापक अमोल फुले यांनी मनोगतामध्ये व्यक्त केले.
तसेच वैभव चव्हाण याने पाच किलोमीटर चालणे पुणे विभागात तृतीय क्रमांक, पुणे विभागीय वुशू स्पर्धेत उबेद आतार याचा द्वितीय क्रमांक आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक उमेश भिंगे, संजय राऊत, भिमाशंकर पाटील, तानाजी शिंदे, भिमराव दुधाळ यांचाही सत्कार केला. सदर कार्यक्रमासाठी उप मुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य संजय शिंदे, व्यवसाय विभागाचे उपप्राचार्य रणवरे सर, पर्यवेक्षक उपस्थित होते. अशा सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन मार्गदर्शक संचालक मा. जयसिंह मोहिते पाटील, संस्था अध्यक्ष मा. संग्रामसिंह मोहिम पाटील,प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा मा. स्वरूपाराणी मोहिते पाटील, सचिव, सहसचिव, स्थानिक प्रशाला समिती सदस्य, शिक्षक शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.



