शहर

वयोवृद्ध बापाची 1 करोड रुपयांची फसवणूक.. नवरा आणि बायकोवर सफाळे पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांनी केला 420 गिरीचा गुन्हा दाखल.

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक. 7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत.

पालघर जिल्ह्यातील सफाळे गिराळे येथील सख्या मुलाने केली आपल्या बापाची 1 करोड रुपयांची फसवणूक अशी बातमी 4 जून 2023 रोजी टाईम्स नाईन न्यूज मराठी चॅनल पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत यांनी आमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्ध केली होती. याबाबत या फसवणुकीच्या तपासामध्ये सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत.अशी तक्रार प्रभाकर पाटील यांच्या नातेवाईकांनी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना केल्यावर त्यांनी एका वयोवृद्धाची फसवणूक या केस कडे विशेष लक्ष वेधून या केसमधील कागदपत्रांच्या तपासणीचे आदेश आर्थिक गुन्हे शाखा पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत यांच्याकडे सोपवले होता.

या फसवणुकीच्या तक्रारी मधील कागदपत्रांचा तपास पालघर आर्थिक गुन्हे शाखा पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष राऊत आणि सफाळे पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी तसेच पोलीस उपनिरीक्षक प्राजक्ता पाटील या सर्वांनी केल्यावर प्रभाकर पाटील यांचा मुलगा प्रयान प्रभाकर पाटील यांनी त्यांच्या वडिलांच्या बँक ऑफ इंडिया विरार येथील खात्यातील 1 करोड 2 लाख 60 हजार रुपये चेकवर खोटी सही करून परस्पर काढून ते पैसे त्यांची पत्नी सौ.परिता प्रयान पाटील हिच्या नावावर केले होते याबाबत या दोघांवर सफाळे पोलीस ठाण्यात 26 जुलै 2023 रोजी 420 गिरीचा असा फसवणुकीचा गुन्हा सफाळे पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांनी नोंद केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button