शहर

पाकिस्तानच्या कैदेतील खलाश्यांच्या कुटुंबांना वर्षभर पुरेल इतके अन्नधान्य व इतर गृह उपयोगी वस्तु मदत करून खासदार राजेंद्र गावित यांनी साजरा केला तलासरी येथे वाढदिवस.

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640 पालघर जिल्हा वृत्तांत.

पालघर लोकसभा खासदार राजेंद्र गावित यांनी 24 जुलै रोजी आपला वाढदिवस पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या कुटुंबियांसोबत साधेपणाने साजरा केला. यावेळी त्या 19 कुटुंबांना रेशन व जीवनावश्यक वस्तू भेट देऊन मदत केली.

पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू येथील खलाशी गुजरात येथून समुद्रात मासेमारी करतांना चुकून पाकिस्तान हद्दीत गेल्याने पाकिस्तान सैन्याकडून अटक करण्यात आली होती. चार वर्षापासून हे आदिवासी खलाशी बांधव पाकिस्तानमध्ये कैदेत होते. त्याकरिता जिल्ह्याचे एक जबादार लोकप्रतिनिधी म्हणून आणि आदिवासी खलाश्यांची लवकरात लवकर पाकिस्तानाच्या जेलमधून सुटका व्हावी याकरिता खासदार राजेंद्र गावित यांनी भारतीय परराष्ट्र मंत्री यांच्याशी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने पाकिस्तान कैदेत असलेल्या काही खलाश्यांची सुटका करण्यात आली होती. त्यामध्ये तलासरी व डहाणू तालुक्यातील 19 खलाश्यांची सुटका झाली. त्याचप्रमाणे सदर खलाशी वाघा बॉर्डर मार्गे त्यांच्या मूळगावी सुखरूप पोचले आहेत.

या खलाश्यांची खासदार राजेंद्र गावित यांनी झाई ग्रामपंचायत सभागृहात आपल्या वाढदिवसानिमित्त
आयोजित कार्यक्रमात विचारपूस करित प्रत्येक खलाशांना सहा महिने पुरेल एवढे रेशन व जीवनावश्यक वस्तूं प्रत्येकी एक (किट) मदत देऊन आपला वाढदिवस साधेपणाने साजरा केला. तसेच खासदार गावित यांनी शासनाकडे केलेली मागणी आणि पाठपुराव्याला यश मिळाले असून यापुढे जे खलाशी चुकून पाकिस्तानी कैदेत फसले असतील अश्या प्रत्येकी कैद्याला केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रतिदिन 300 रुपये प्रमाणे महिनाकाठी 9 हजार रुपयांची शासनाकडून आर्थिक मदत पीडित कुटुंबातील सदस्याला मिळणार आहे, अशी माहिती दिली.

यावेळी राजेंद्र गावित, सहायक पोलिस निरीक्षक घोळवड गजानंद पडळकर, पपु यादव, राजेश मनवळकर, प्रकाश पाटील आणि झाई येथील मच्छीमार समाज, ग्रामस्थ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button