महाराष्ट्र

माढा तालुक्यातूनच होतोय आमदार बबन दादा शिंदे यांना विरोध..!

🎯एका अनाहूत कार्यकर्त्यांने लिहिले शरद चंद्र पवार साहेबांना पत्र

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

प्रति,
श्रीमान शरदचंद्रजी पवार साहेब,
अध्यक्ष,राष्ट्रवादी पक्ष.गोविंद बाग, बारामती,

विषय:- श्री.बबनराव शिंदे यांना माढा
मधून राष्ट्रवादी(शरद पवार)
पक्षाची उमेदवारी देऊ नये…

महोदय,
साहेब, खरंतर पत्र लिहायला जरा उशीरच झाला पण काय करणार चालू घडामोडी व्यथित करणाऱ्या आहेत म्हणून लिहावं लागलं…..
पवार साहेब हे लक्षात घ्या….

आपल्या पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सगळीकडे फिरताना एकच जयघोष होयचा *वाजवा तुतारी गाडा गद्दारी.. या जयघोषाला जनतेतुन प्रचंड प्रतिसाद मिळायचा याच कारण एकच होत पवार साहेबांना सोडून अजित दादा बरोबर गेलेल्या 40 आमदारांवर जनतेचा राग होता,तुम्ही काढलेला पक्ष, चिन्ह चोरल्याचा रोष होता त्या अलिबाबा व 40 चोरांत आमच्या करमाळा-माढा चे 2 चोर होते याचा आम्हाला अजूनही राग आहे आणि तो मतपेटीतून आम्ही दाखवून देऊ परंतु जर तुम्हीच या गद्दारी ला माफी दिलीत तर संपूर्ण राज्यात चुकीचा संदेश जाईल…..

साहेब, मागच्या वेळेस आपण माढा तालुक्यात कापसेवाडीला शेतकरी मेळावा घेतला होता त्यावेळी माढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नावावर आ.बबनराव शिंदे यांनी काढलेल्या बोगस कर्जाच्या विषयी आपण बोलला होतात, अश्या भानगडी करणाऱ्याच्या बंदोबस्त करू व आगामी निवडणूकित या लोकांविरुद्ध निकाल आपण घेऊ अस आपण म्हणला होतात….मग आता अस काय झालं की त्या बबनराव शिंदेचा बंदोबस्त करण्याऐवजी तुम्ही त्याला उमेदवार करायला निघालात..यामुळे जनतेत संभ्रम पसरला आहे की, साहेब नेमक बबनदादाचा बंदोबस्त करणार की जनतेचा…?साहेब, निष्क्रिय शिंदेबंधू विरोधात माढा करमाळा मध्ये तीव्र लाट आहे त्याची चुणूक लोकसभेला दिसून आली आहे.

साहेब, तुम्ही सहकाराचे नेते, तुमच्यासारख्या जुन्या लोकांनी मोठ्या कष्टाने उभे केलेला आमचा जिल्हा दुध संघ चेअरमन असणाऱ्या रणजित शिंदेंनी बंद पाडला आहे, संघाची जमीन विकायला काढली आहे,रणजित शिंदे च्या आर्थिक गोष्टीतील हस्तक्षेपमुळे विठ्ठलराव शिंदे सह कारखान्याचे अधिकारी काम सोडून जात आहेत, कारखाने प्रचंड कर्जबाजारी झाले आहेत, त्याने इंडी चा कारखाना विकला ,केवड च्या पगारी नाहीत, संजय शिंदे नि म्हैसगाव विकला,विक्रमने करमाळा च्या शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत, हजारो शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज काढून सिबील खराब केली आहेत,शेतकरी नाराज आहे, मराठा आंदोलनकर्ते मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरुद्ध भूमिका घेतली आहे त्यामुळे मराठा समाजात शिंदे बंधु वर तीव्र नाराजी आहे.जारांगेनी तर उमेदवार पाडायची सुरुवात माढा मधून करा असे सोलापूर च्या सभेत सांगितले आहे, जरांगे पाटील यांच्या करमाळा मधील सभेवरून पोलीसांनी आमदाराच्या सांगण्यावरून गुन्हे दाखल केल्याचे खुद्द मनोज जरांगे यांनी सांगितले आहे याबद्दल जनतेत प्रचंड राग आहे.
साहेब, माढा तालुक्यात जि प चे 6 सदस्य आहेत त्यापैकी रणजित शिंदे पण होते परंतु जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत हा रणजित शिंदे पराभूत झाला,माढा चे 6 सदस्य होते व 5 सदस्याचा कोटा आवश्यक असताना रणजित शिंदे पडला यावरून याची राजकीय पत लक्षात येते..

साहेब, 30 वर्षात शिंदे कुटुंबाने माढा तालुक्यामध्ये एक चांगल हॉस्पिटल, एक चांगली शैक्षणिक संस्था, एमआयडीसी, रोजगार,रस्ते, बसस्थानक, उपलबद्ध करून दिला नाही. कुर्डुवाडी, माढा, टेंभुर्णी ही खेडं गाव आहेत त्यांना शहर कोणी म्हणणार नाही अशी बकाल अवस्था आहे..अशा शिंदे बंधू ना तुम्ही जर काही कारणाने आपण तिकीट दिले तर आपणावर प्रेम करणारे आमच्या सारखे अभागी जनता आम्हीच असू.आता आपण ठरवायचे आहे गद्दारी गाडायची का गद्दारी ला प्रोत्साहन द्यायचं…

                    कळावे,

पवार साहेबांवर विसंबून शिंदे बंधूंना विरोध करून लोकसभेला तुतारी ला मतदान केलेली माढा,करमाळा तालुक्यामधील त्रस्त जनता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button