महाराष्ट्र

शाश्वत व लोकाभिमुख विकासासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध – माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे प्रतिपादन

उपसंपादक—— हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो ;- 97 30 867 448

चिकुंद्रा येथे महाविकास आघाडीच्या विद्यार्थी गुणगौरव व जनसंवाद मेळाव्यास उत्स्फूर्त
जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द जिवंत आणि जिज्ञासा जागृत असायला हवी . ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवून खडतर परिश्रम व दृढ इच्छाशक्तीच्या बळावर प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत प्रचंड आत्मविश्वासाने दहावी बारावीच्या परीक्षेत मिळविले यश हे कौतुकास्पद असुन महाविकास आघाडीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम विधायक व स्तुत्य आहे .पुढील काळातही तालुक्यासह राज्याच्या शाश्वत आणि लोकाभिमुख विकासासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केले .

तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा येथे महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव व जनसंवाद मेळाव्याच्या निमित्ताने चिकुंद्रा व पंचक्रोशीतील इयत्ता दहावी व बारावी मध्ये उत्तुंग यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी ते बोलत होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच विश्वनाथ मोटे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सुनील चव्हाण , जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष , ॲड, धीरज पाटील , माजी जि . प. सभापती मुकुंद डोंगरे ,शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख शाम पवार .कमलाकर चव्हाण , ,जि .प . सदस्य प्रकाश चव्हाण,राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस महेश कदम , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक पाटील , सुनील जाधव , संजय भोसले ,

सुभद्राताई मुळे , दिलीप सोमवंशी ,सरदारसिंग ठाकूर , शिवसेना नळदुर्ग शहर प्रमुख संतोष पुदाले , लक्ष्मण शिंदे ,शिवराज मर्डे, संजय गुंजोटे , ज्ञानेश्वर भोसले , हरीश जाधव , प्रकाश भोसले , अमर नरवडे , अर्चनाताई शिंदे , कै . देवरावजी चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष यशवंत गायकवाड , सचिव सुनंदा जगदाळे ,मुख्याध्यापक पांडुरंग पवार , दीक्षा गवळी , मधुकर गायकवाड , विलास सरडे आदींची उपस्थिती होती .यावेळी पुढे बोलताना मधुकरराव चव्हाण म्हणाले की ,शेतकरी , शेतमजूर कामगार व वंचित समाज घटकासह सर्वहारा वर्गाच्या शेती , सिंचन , व ग्रामीण विकासाच्या पायाभूत सुविधासह सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी महाविकास आघाडीच्या सोबत राहावे असे आवाहन मधुकरराव चव्हाण यांनी केले .

याशिवाय धीरज पाटील , सुभद्राताई मुळे , कमलाकर चव्हाण ,महेश कदम , मुकुंद डोंगरे ,आदींची भाषणे झाले या कार्यक्रमात श्री .भैरवनाथ माध्यमिक विद्यालयातील कुमारी संयोगिता जोगी , अपेक्षा गायकवाड, शबनम शेख , मयुरी जाधवर नळदुर्ग महाविद्यालयाचा विद्यार्थी राम गायकवाड सह चिकुंद्रा पंचक्रोशीतील विविध शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह , शाल ,सन्मानपत्र व पुष्पहार देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत गायकवाड ,अमोल गायकवाड , सोनाली कानडे , अंबादास मोटे ,शशिकांत गायकवाड , सुधाकर गायकवाड , संतोष मोटे , सचिन गायकवाड , आशिष जगदाळे , सागर मोटे , अमर गायकवाड , रघुनाथ मोटे , दत्ता मोटे , लखन मोटे ,सौदागर गरड आदींसह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले .या कार्यक्रमास जळकोट ‘ नळदुर्ग , सलगरा , होर्टी , किलज , गंधोरा , मुर्टा , येथील पदाधिकारी , कार्यकर्ते व पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button