शहर

गुजरातमधून 40 हजार महिला आणि मुली बेपत्ता_नॅशनल क्राइम ब्युरोकडून धक्कादायक माहितीत्या लेकी हवेत गायब झाल्या की जमिनीत गडप

उपसंपादक ———हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क मो. 97 30 867 448

गेल्या 5 वर्षांत गुजरातमधून 40 हजार महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. नॅशनल क्राइम ब्युरोने ही धक्कादायक माहिती समोर आणली आहे. शिवसेनेने सामना संपादकीयमधून या मुद्द्याला हात घातला असून केंद्र सरकारवर जोरदार टीका केला आहे. ही माहिती समोर आणल्याबद्दल नॅशनल क्राइम ब्युरोला कायमचे टाळे लागू शकते अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

महाराष्ट्रातून दररोज 70 मुली बेपत्ता होत असताना मिंधे सरकार काय करत आहे? अशी विचारणाही करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री शहा ही जोडगोळी आपणच विश्वाचे तारणहार असल्याच्या आविर्भावात वावरत असते. 2014 च्या आधी भारत देश अस्तित्वात नव्हता, येथे कायदा नव्हता. संस्कृती नव्हती. 2014 ला मोदी आले आणि देशात सगळे आबादी आबाद झाले, असे ते आणि त्यांची भक्तमंडळी सुचवीत असते. मात्र आता मोदी शहांच्या कारभाराचे ढोंग उघडे पाडणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गेल्या पाच वर्षांत गुजरातमधून 40 हजार महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. हा आरोप मोदी यांना पाण्यात पाहणाऱ्या राजकीय विरोधकांनी केलेला नाही. नॅशनल क्राइम ब्युरोने ही धक्कादायक माहिती समोर आणली व ही माहिती समोर आणल्याबद्दल नॅशनल क्राइम ब्युरोला कायमचे टाळे लागू शकते.

कारण गुजरातमधील राज्यकारभाराचे धिंडवडेच या अहवालाने निघाले आहेत, असं शिवसेनेने म्हटलं आहे. जगाच्या पाठीवर गुजरातसारखे दुसरे राज्य नाही. गुजरात हेच देशाच्या विकासाचे एकमेव मॉडेल आहे असा प्रचार होतो. जागतिक नेत्यांना दिल्ली मुंबईच्या आधी गुजरातेत आणून मोठे कार्यक्रम घेतले जातात. गुजरात हे पंतप्रधान मोदींचे राज्य असल्याने तेथे जणू स्वर्ग अवतरला आहे असे चित्र निर्माण केले जाते, पण प्रत्यक्षात गुजरातची काळी बाजू यानिमित्ताने बाहेर पडली व ती धक्कादायक म्हणावी लागेल. कश्मीर फाइल्स, द केरला स्टोरी प्रमाणेच विवेक अग्निहोत्रीसारख्यांनी गुजरात फाइल्सची निर्मिती करायला हरकत नाही, पण द केरला स्टोरी आणि कश्मीर फाइल्स बाबत हे सत्य आहे, दडपता येणार नाही’ असे प्रचारकी भाष्य मोदींसह समस्त भाजपने केले ते गुजरातमधील बेपत्ता 40 हजार मुलींवरील स्टोरीला निदान पडद्यावर तरी पाठबळ देतील काय? अशी विचारणा शिवसेनेने केली आहे

‘देशातील महिला असुरक्षित आहेत. महिला अत्याचाराच्या रोज थरारक कहाण्या प्रसिद्ध होत आहेत. दिल्लीच्या जंतर मंतरवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महिला कुस्तीपटू न्यायासाठी बसल्या आहेत, पण त्यांच्यावर ना पंतप्रधान मोदी बोलतात ना गृहमंत्री शहा बोलायला तयार. पुन्हा त्यांच्या एकट्या गुजरातमध्येच 40 हजार महिला-मुली बेपत्ता होणे गंभीर आहे. हा आकडा एकट्या गुजरातचा असेल तर संपूर्ण देशातील आकडा भयावहच असायला हवा. आपणच महिला वर्गाचे एकमेव तारणहार आहोत, असे पंतप्रधान सांगतात. महिलांसाठी जन धन योजनेसारख्या काही योजना त्यांनी सुरू केल्या, पण प्रश्न अशा योजना किंवा महिला सबलीकरणाच्या बोलबच्चनगिरीचा नसून महिलांच्या मोठ्या प्रमाणात बेपत्ता होण्याचा आहे अशी माहिती शिवसेनेने दिली आहे.

धुळे-नंदुरबार ही गुजरातच्या सीमेवरील राज्ये. महाराष्ट्राच्या या दोन्ही जिल्ह्यांतून महिला-मुली मोठ्या प्रमाणात गुजरातेत कामधंद्यासाठी जातात. काहींना तेथे लग्नाचे आमिष दाखवून नेले जाते व त्या हजारो महिला-मुलींचा पुढे थांगपत्ता लागत नाही. या मुलींचे नातेवाईक गुजरात-महाराष्ट्र पोलिसांचे उंबरठे झिजवतात व शेवटी मरून जातात. हे चित्र चांगले नाही. मुली गायब होणे हे गूढ आहे. गुजरातेत चाळीस हजार महिला गायब होतात, पण महाराष्ट्रातल्या मुली गायब होण्याचे प्रमाण गुजरातच्या तुलनेत कमी आहे. अर्थात असे असले तरी हा आकडा किमान वीस हजार इतका असावा. आता तर अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे की, महाराष्ट्रातून दररोज 70 मुली बेपत्ता होत आहेत. गेल्या फक्त तीन महिन्यांतील ही संख्या तब्बल साडेपाच हजारांपेक्षा जास्त आहे. मग राज्यातील मिंधे सरकार आणि त्याचे गृहखाते काय करीत आहे? असा प्रश्न शिवसेनेने विचारला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button