पालघर जिल्ह्यातील सफाळे तांदुळवाडी येथे 25 ते 28 मे रोजी चिरंजीवी संघटने मार्फत शालेय मुलांसाठी मोफत बाल शिबिराचे आयोजन

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत
जिज्ञासू बालकांची मानवतावादी संघटना गेल्या 10 वर्षांपासून बालकांच्या अधिकारासाठी रचनात्मक व संघर्षात्मक काम करत आहे.या संघटनेचे सालाबादा प्रमाणे यंदाही शालेय मुलांचे मोफत बाल शिबीर 25 ते 28 मे 2023 रोजी पालघर जिल्ह्यातील सफाळे नाईक फाऊंडेशन,प्रीमॅड हाऊस,पारगाव ब्रिजच्या बाजूला तांदुळवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती शिबीर प्रमुख राज्य कार्यवाह ऐश्वर्या तोडकरी यांनी दिली.या शिबिराच्या माध्यमातून कुमार कुमारींचा सर्वांगीन व्यक्तिमत्त्व विकास घडवला जातो.बालकांच्या अधिकाराची गाणी ,पथनाटय,नवनवीन खेळ,मान्यवरांची व्याख्यानं व अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून मुलांमध्ये प्रबोधन करण्याचे काम केले जाते असे संघटनेच्या राज्याध्यक्ष नेहा भोसले यांनी माहिती दिली आहे.

करोनाच्या वातावरणात शिबीर घेणे शक्य झाले नाही. करोनाच्या वातावरणात मोबाईल व online गेम मुळे बरीच मुले मुली भयानक हिंसक तर झाली पण मानसिक तणावात आजही आहेत अनेकांवर खास करून मुलींवर कौटुंबिक अत्याचार झाले आणि त्याचा बराच परिणाम शरिरावर व अभ्यासावर होत आहे.असे संघटनेचे राज्य संघटक हर्ष तेलुरे यांचे मत आहे . अशा परिस्थिती मध्ये मौज आणि मज्जा मस्ती शिबिर 12 ते 18 वयोमर्यादा असलेल्या मुलांसाठी एक वेगळा वळण देणारे शिबिर ठरणार आहे. या शिबिराच्या आयोजनाने आत्मविश्वास वाढेल
तसेच खेळ ,गंमत गाणी ,गोष्टी , व धम्माल उपक्रमातून मुली मुलांचा आत्मविश्वास देखील वाढवता येईल करियर ठरवणे ,मोबाईल टिव्हीचा मर्यादित व आवश्यक वापर कसा करावा ,निती मुल्यांचे महत्व या विषयांवर हसत खेळत प्रबोधन देखील या शिबिरात लहान मुलांना करण्यात येणार आहे
हे शिबीर मोफत असून विद्यार्थ्यांनीच विद्यार्थ्यां साठी आयोजन लोकनिधीतून केले आहे या शिबिरास मैत्रकुल व संघटनेचे संस्थापक जेष्ठं कार्यकर्ते व बालकांचे लाडके किशोर पवित्रा भगवान गणाई व चिरंजिवी संघटनेच्या राज्याध्यक्षा नेहा भोसले,भारतीय ग्रेटा अवली ( सलोनी तोडकरी) व बालविवाह विरोधी चळवळीच्या प्रणेत्या, चिरंजिवी संघटनेच्या प्रथम अध्यक्षा मंजिरी धुरी व अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच ऐश्वर्या तोडकरी मराठी भारती अध्यक्षा ऍड. पुजा बडेकर ताई छत्रशक्ती खजिनदार विजेता भोनकर,छात्रशक्ती संस्थेच्या सचिव स्मिता ताई साळुंखे मैत्रकूल प्रमुख आशिष गायकवाड, छात्रशक्ती संस्थेचे
M. D.सचिन सुतार व गणाई अध्यक्षा श्रेया निकाळजे यांची विशेष उपस्थिती असणार आहे
:+917499687914,सलोनीतोडकरी:-+917887648501 या नंबरवर संपर्क करावा व लहान मुलांच्या धम्माल – मस्ती – मज्जा शिबीरा करता आर्थिक किंवा धान्य किंवा अशा अनेक गोष्टींसाठी मदत करावी असे आवाहन संघटनेच्या राज्य खजिनदार प्रगती कांबळे ह्यांनी केल्याची माहिती राज्य सोशल मीडिया प्रमुख संदिप बनसोडे यांनी काढलेल्या पत्रकात दिली आहे.



