महाराष्ट्र

राज्यात धोधो पाऊस पडू दे – संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल -8378076123

राज्यात धोधो पाऊस पडू दे, बळीराजाला सुखी, समाधानाचे दिवस येवू दे, धनधान्याने घर भरू दे तसेच शेतमालाला दर मिळून शेतकरी राजा समाधानाने जगू दे असे साकडे संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी श्री लक्ष्मी नृसिंह चरणी घातले.

नीरा नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात आज खासदार सुप्रिया सुळे यांनी श्री लक्ष्मी नृसिंहाचा पुजा व आरती केली. यावेळी प्रशांत पाटील, प्रताप पाटील, श्रीमंत ढोले, हनुमंत कोकाटे, सुरेश शिंदे, नरहरी काळे, पांडुरंग डिसले, श्रीकांत बोडके, दादासाहेब क्षिरसागर, सचिन सपकाळ, दत्तात्रय घोगरे, गौरव दंडवते, दशरथ राऊत, सागर मिसाळ, शंकर राऊत, शितल कांबळे, अरूण क्षिरसागर, सरपंच अश्विनी सरवदे, उपसरपंच रोहिणी काकडे, अर्चना सरवदे, रेहाना मुलाणी आदि उपस्थित होते.

सुप्रिया सुळे यांनी आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला भरभरून मते मिळून आमचे सरकार स्थानापन्न व्हावे साकडेही यावेळी घातले.
पौराहित्य प्रसाद दंडवते यांनी केले. यावेळी परीसरात ग्रामस्थ, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button