महाराष्ट्र

छत्रपती संभाजी राजे यांना फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट हा आदर्श मानत होता — चंद्रशेखर गायकवाड

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

मनाचा निश्चय , जीवनातील शिस्त, ध्येयाची योग्य दिशा, आणि स्वराज्यासाठी समर्पण वृत्ती हे संभाजी राजांचे खास गुण होते हे गुण अंगी बाळगणारा युवकच छत्रपती संभाजी राजांच्या विचारांच्या निकट जाऊ शकतो. शेतकऱ्यांसाठी मेळावा घेणारे शेतकऱ्यांना शून्य टक्के ने कर्ज देणारे, शेतकऱ्यांना राज्य कोषातून बैल बियाणे देणारे दुष्काळात चारा छावणी उभारून पशुधन वाचवणारे छत्रपती संभाजीराजे इतिहासकारांना समजले नाहीत .

लोकांना धार्मिक स्वातंत्र्य जपण्यासाठी पुन्हा स्वधर्मात घेणारे संभाजीराजे आम्हाला अजूनही समजले नाही गुलामांच्या खरेदी विक्रीवर बंदी आणण्यासाठी अरबी सुलतानाच्या जहाजावर हल्ला करून गुलामांची सुटका करणारे संभाजी राजे मानवतावादी होते आभाळाची व्यापकता आणि सागराची व्यापकता ज्यांच्या कार्याला हे असे अफाट कर्तुत्वाचे मेरूमणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनाचे विचारांचे कर्तुत्वाचे नेतृत्वाचे पराक्रमाचे उच्च जीवन मूल्यांचे दर्शन त्यांच्या जीवनचरित्रातून घडते .

रणांगणावरती पाखर्या नावाच्या घोड्याला एका पायावर गर्रकन फिरवून रणघोषणा करून प्रत्येक मावळ्यामध्ये दहा हत्तींचे बळ निर्माण करणारे सेनानी म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. भूतकाळ ,वर्तमानकाळ, भविष्यकाळ या तीनही काळातील युवाशक्तीचे मन मेंदू मनगट मजबूत करणारे प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजे संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज म्हणजे बुद्धिमत्ता शौर्य पराक्रम संघटन यांचा मेरूमणी छत्रपती संभाजी महाराज म्हणजे एका हातात तलवार दुसऱ्या हातात लेखणी घेऊन राजकीय आणि सामाजिक क्रांतीसाठी संघर्ष करणारे एक विद्रोही व्यक्तिमत्व.

युरोपमध्ये जर्मनी पराक्रमी तसाच भारतात महाराष्ट्र पराक्रमी कारण राष्ट्रासाठी अवघ आयुष्य समर्पित करण्यासाठी आहूती देण्यासाठी संभाजी राजांसारखे राष्ट्रभक्त याच महाराष्ट्राच्या मातीत आदर्शाची पेरणी करून गेले संभाजी राजेंच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून संताजी धनाजी सारखे हजारो स्वातंत्र्ययोध्दे निर्माण झाले आणि त्यांनी कबर बांधली औरंगजेब बादशहाची .महाराष्ट्राची युद्धभूमी औरंगजेबासाठी दफनभूमी ठरली महाराष्ट्राची भूमी ही स्वातंत्र्ययोध्दाची भूमी आहे पराक्रमी माणसांची भूमी आहे.

आण्णाजी दत्तो ,बाळाजी आवाजी इ मंत्र्यांना छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य द्रोहाच्या कटाखाली हत्तीच्या पायी देऊन ठार केले ,बाळाजी आवाजीच्या खापर पणतूने संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १२२ वर्षांनी सुडाने बखर लिहली तीच बखर अनेक नाटककारांनी चित्रपट वाल्यांनी संदर्भ ग्रंथ म्हणून वापरली आणि संभाजीराजांचे चारित्र्य मलिन आणि दूषित करण्यात आले.आतापर्यंत संभाजी महाराजांच्या जीवनावर ७० नाटके आणि १४ चित्रपट निर्माण झालेले आहेत”असे विचार शिवव्याख्याते चंद्रशेखर गायकवाड यांनी मांडले.

दिनांक १४ मे २०२३ रोजी सकाळी १० वाजता अकलूज येथे मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने जयंती साजरी करण्यात आली.यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते – पाटील ,मा आमदार श्री राम सातपुते,माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते- पाटील,मराठा सेवा संघ पुणे प्रदेश अध्यक्ष –
उत्तमराव माने उपस्थित होते.

पुणे प्रदेश जिजाऊ ब्रिगेडच्या प्रांतिक सदस्या -आक्कासाहेब माने, प्रिया नागणे,जिजाऊ ब्रिगेड पुणे विभागीय सचीव मा वनिता कोरटकर ,संभाजी ब्रिगेड माळशिरस तालुका अध्यक्ष दिगांबर मिसाळ ,उपाध्यक्ष सचीन पराडे ,माजी तालुका अध्यक्ष मा बबनराव शेंडगे ,पत्रकार निनाद पाटील सर्वांच्या हस्ते प्रतिमा पूजन घेण्यात आले.

यावेळी मराठा सेवा संघ ,संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी ,सदस्य तसेच बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रचंलन व आभार मराठा सेवा संघ माळशिरस तालुका सचिव राजेंद्र मिसाळ यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button