पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केली अंतराळवारी करणार्या भारतीयांची घाेषणा

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
तिरुअनंतपूरम:अंतराळ संशोधन संस्थेने मानवरहित गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांची नावे जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 1800 कोटी रुपयांच्या तीन अंतराळ पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अंतराळवीरांना पंख प्रदान करून, गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांना इस्रोने जगासमोर आणले. भारतीय भूमीवरून स्वदेशी अंतराळ वाहनातून अंतराळात जाणारे भारतीय हवाई दलाचे चार अधिकारी हे पहिले भारतीय असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या प्रकल्प उद्घाटनादरम्यान गगनयान मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी गगनयान मोहिमेतील अंतराळवीर म्हणून नियुक्त केलेल्या चार जणांना अंतराळवीर पंख प्रदान केले. यामध्ये ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशू शुक्ला या चार अंतराळवीरांचा समावेश आहे. या चारही अंतराळवीरांनी रशियामध्ये व्यापक प्रशिक्षण घेतले आहे, असे देखील इस्रोने स्पष्ट केले आहे.



