ठाणे हद्दीतून लहान मुलांचे अपहरण करून पळून घेऊन जाणाऱ्या आरोपींना जेरबंद करण्यात कासा पोलीस ठाणे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांच्या पथकाला यश

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640
पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाणे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांच्या पथकाला लहान मुलांचे अपहरण करून पळून घेऊन जाणाऱ्या सहा आरोपींना जेरबंद करण्यात शुक्रवारी रात्री यश आले असून या आरोपींच्या ताब्यातून दोन लहान मुलांची सुखरूप पणे सुटका करून त्यांना त्यांच्या कुटुंब्यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
नवरात्री उत्सवा दरम्यान पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी नवरात्र उत्सव नऊ दिवस साजरा केला जाणार आहे. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे अधिकारी यांना आपापल्या हद्दीत प्रभावी गस्त करण्याबाबत सक्त सूचना जारी केल्या आहेत.
या सूचनांची अंमलबजावणी करताना कासा पोलीस ठाणे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांचे पथक शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री नऊ वाजता डायल 112 या वाहनातून कासा पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असताना चारोटी ब्रिजच्या खाली काही इसम व महिला आपसामध्ये वाद विवाद करून एकमेकांना मारहाण करत असल्याचे दिसून आल्यावर या पथकाने त्यांना ताब्यात घेतल्यावर त्यांच्याकडे दोन लहान मुले दिसून आली या दोन लहान मुलांची पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांना कल्याण हद्दीतून पळून आल्याची त्यांनी माहिती दिल्यावर विजय गोसावी वय वर्ष (29 ), आकाश गोसावी वय वर्ष (28), अंजली गोसावी वय वर्ष (28), चंदा गोसावी वय वर्ष (55), जयश्री गोसावी वय वर्ष (25), राहुल गोसावी वय वर्ष (27), राहणार सर्व जिल्हा सांगली तालुका- मिरज मेसाळ विजयनगर येथील रहिवासी आहेत.या सर्वांना कासा पोलिसांनी जेरबंद करून या दोन लहान मुलांना ठाणे येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यामार्फत त्यांच्या कुटुंबांच्या स्वाधीन सुखरूप पणे केले आहे.
सदरची यशस्वी कारवाई पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, जव्हार विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कासा पोलीस ठाणे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे, पोलीस हवालदार मनोहर शंकर जाधव, पोलीस चालक जगदीश श्रीधर जाधव, पोलीस शिपाई इस्राईल चांद सय्यद यांनी केली आहे.



