महाराष्ट्र

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने प्राध्यापक रामदास झोळ यांचा उद्या रिधोरे येथे जनसंवाद यात्रा व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

करमाळा-माढा संयुक्त विधानसभा मतदारसंघातील मौजे रिधोरे, ता. माढा येथे दिनांक ०६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायं .०७:०० वा. प्रा. रामदास झोळ सर यांचा “जनसंवाद व शेतकरी मेळावा” आयोजित करण्यात आले आहे. सदर मेळाव्याचे आयोजन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने करण्यात येत आहे. तरी करमाळा तालुका व माढा संयुक्त विधानसभा मतदारसंघातील जनतेशी त्यांच्या विविध समस्यांवरती विचारविनिमय करण्यात येणार आहे.

तसेच शिक्षण, आरोग्य व रोजगार या समस्यांवर कसा उपाय योजना आखण्यात येईल यासाठी प्रा. रामदास झोळ सर जनतेशी संवाद साधणार आहेत. आपल्या शेतमालाला हमीभाव व उसाला योग्य दर कसा मिळेल याबाबत प्रा. रामदास झोळ सर शेतकऱ्यांची संवाद साधणार आहेत. तरी सर्व जनतेला आव्हान करण्यात येत आहे की सदर जनसंवाद यात्रा व शेतकरी मेळाव्यास आपण बहुसंख्य संख्येने उपस्थित राहून मेळाव्याची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button