तर,,,करमाळा विधानसभा अजितदादा पवारांनी घड्याळ चिन्हावर लढवावी !! अन्यथा शिवसेनेला मतदारसंघ सोडावा – जिल्हाप्रमुख महेश चिवटे!

करमाळा (प्रतिनिधी ) अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
महायुतीच्या धोरणाप्रमाणे सत्ताधारी आमदारांना विधानसभेचे तिकीट द्यायचा धोरण वरिष्ठ नेत्यांची आहे मात्र करमाळ्यातले विद्यमान आमदार घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास नकार देत असून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा करत आहेत अशा परिस्थितीत नामदार अजित पवारांनी करमाळ्यातील विधानसभा घड्याळ चिन्हावर लढवावी अन्यथा धनुष्यबाणावर शिवसेनेला निवडणूक लढवण्याची संधी द्यावी अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चिवटे यांनी दिली आहे
आमदार संजय मामा शिंदे घड्याळ चिन्ह न घेता अपक्ष लढणार आहेत यावर प्रतिक्रिया घेण्यासाठी चिवटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली
अजितदादा पवार बारामतीतून निवडणूक न लढवता शिरूर मधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे
करमाळ्याची जागा गेली 25 वर्षापासून शिवसेना धनुष्यबाणावर लढवत आहे मात्र ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला जाणार असल्याची निश्चित झाले असले तरी विद्यमान आमदार अजितदादा समर्थक संजय मामा शिंदे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास तयार नाही

तर ही जागा शिवसेनाच लढवणार असा दावा शिवसेनेचे सचिव किरण साळी प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे माढा लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे सह वरिष्ठ नेते मंडळींनी केली आहे
शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षातील बाहेरच्या उमेदवाराचा प्रचार करावा लागतो ही खंत कार्यकर्त्याकडून प्रत्येक विधानसभा निवडणुकीत व्यक्त केली जाते मात्र यावर्षी तालुक्यातील गटातटाचे राजकारण मोडीत काढायचे असेल तर शिवसेना-भाजपच्या कोणत्याही निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी द्या व करमाळ्यातील महायुतीची ताकद आजमावून बघू अशी मागणी सेना भाजपचे कार्यकर्ते करत आहेत
दरम्यान बागल गटांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करून करमाळा विधानसभा कमळावर लढवण्याची तयारी चालू केली आहे
करमाळा येथे झालेल्या अजित पवारांच्या सन्मान रॅली मध्ये कोणत्याही बोर्ड व बॅनरवर घड्याळाचे चिन्ह किंवा उल्लेख नव्हता यावेळी भाषणात सुद्धा कोणीही घड्याळाचा उल्लेख केला नाही
आता करमाळा मतदार संघातून सर्व महायुतीतील वादावर पडदा टाकण्यासाठी अजितदादा पवारांना करमाळ्यातून निवडणूक लढविण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे
अजितदादा पवारांच्या अंबालिका व दौंड शुगर या कारखान्यांना करमाळा तालुक्यातून जवळपास दहा लाख टन ऊस जातो व त्यांच्या कर्मचाऱ्यांची नेटवर्क या तालुक्यात आहे तसेच बागल गट संजय मामा शिंदे गट यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत यामुळे यामुळे बागल व संजय मामा शिंदे यांनी एकत्र काम केले व याला शिवसेना भाजपने साथ दिली तर ही निवडणूक अजित पवारांना सोपी जाऊ शकते असा जाणकारांचा अंदाज आहे



