अकलूज नगरपरिषद आणि महसूल प्रशासनाच्या वतीने देऊळवाले समाजासाठी विशेष मतदार नोंदणी अभियान संपन्न…

प्रतिनिधी रियाज तांबोळी
🎯 शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा या साठी केले शिबिराचे आयोजन…
महसूल प्रशासन व अकलूज नगरपरिषद अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने अकलूज येथील मरीआई देऊळ वाले समाजासाठी विशेष मतदार नोंदणी अभियान व शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी शिबिराचे आयोजिन करण्यात आले होते.तसेच उपजिल्हा रुग्णालय अकलूज यांच्या विशेष सहकार्याने येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज येथे

दिनांक 4. 10. 24 रोजी सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिरास अकलूज व परिसरातील मरीआई देऊळ वाले समाजातील घटकांना विविध योजनांचा लाभ व्हावा या उद्देशाने अकलूज येथील उपविभागीय अधिकारी पांगरकर मॅडम , तहसीलदार श्री शेजुळ साहेब, अकलूज नगर परिषदेचे सिओ श्री.गोरे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अकलूजचे मंडलाधिकारी लकडे मॅडम, जिल्हा उप रुग्णालय अकलूज येथील डॉक्टर व कर्मचारी वर्ग , अकलूज सज्जाचे तलाठी श्री शिंदे भाऊसाहेब , श्री भानवसे भाऊसाहेब, श्री धनवडे भाऊसाहेब,यशवंतनगरचे तलाठी काळे मॅडम, निकम मॅडम यांनी हे शिबिर यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

मरी आई देऊळ वाले समाजातील लोकांचे आरोग्य विषय तपासणी , आधार कार्ड, शिधापत्रिका व इतर शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले. विविध क्षेत्रातील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. सदर शिबिरात समाजातील दोनशे ते तीनशे लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.




