विशेष

जेऊर येथील महिला महोत्सवाचा दुसरा दिवस उखाणे आणि रांगोळी स्पर्धकांनी गाजवला.

करमाळा प्रतिनिधी

अलीम शेख

मोबाईल नंबर 98 50 68 63 60

जेऊर ता. करमाळा येथे माजी आमदार नारायण आबा पाटील मित्रमंडळ आणि ग्रामपंचायत जेऊर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक महिला दिन महोत्सवाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सर्व प्रथम उखाणे स्पर्धा पार पडली. यात महिलांनी ऐच्छिक, अक्षरावरुन सुरु होणारा उखाणा आणि एका विशिष्ट शब्दाचा समावेश असलेला उखाणा या तीनही राऊंड मध्ये खुपच छान उखाणे सादर‌केले.

यात काही उखाणे हे पौराणिक महत्व सांगणारे तर काही उखाणे विनोदाची झालर असलेले असे होते. अक्षराने सुरु होणाऱ्या उखाण्यासाठी परिक्षकांकडून कुंकू हा शब्द स्पर्धकांना देण्यात आला. यावेळी संपुर्ण देशाला सौभाग्याचे लेणे म्हणून ठाऊक असलेल्या करमाळा तालुक्यातील केम या गावाचा उल्लेख करण्यात आला. केम गावाची कुंकु निर्मिती मध्ये असलेली छाप या महोत्सवात देखील‌ दिसुन आली. यानंतर रांगोळी स्पर्धा पार पडली.

यात पाणी काटकसरीने वापरा, सावित्रीबाई फुले पोर्टेट, मुलगी जन्मली घरी लक्ष्मी आली यासह अनेक सामाजिक संदेश देणाऱ्या आकरषक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. शेवटी फनी गेम्स घेण्यात आल्या. यात स्वतः सौ जोतीताई नारायण पाटील‌ सहभागी झाल्याने महिलांचा उत्साह द्विगुणित झाला. कुमारी रिया सुतार आणि कुमारी समीक्षा कुलकर्णी यांनी स्पर्धा चे सुरेख सुरेख सुत्रसंचलन केले. शेकडो महिलांनी उपस्थित राहुन आजचा दुसरा दिवस गाजवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button