शहर

हडपसर कोयता गँग प्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर.

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

दि.१२-६-२०२४ रोजी रात्री १९-३० वा.सुमारास फिर्यादी हे दुकानामध्ये बसलेले असताना आरोपी अमोल जगन्नाथ गाडेकर v इतर तीन इसमानी स्टिंग कोल्ड्रिंक्स चे चाळीस बॉटल्स मागितले असता फिर्यादी ने त्यास नकार दिला असता त्याचा राग मनात धरून सदर आरोपींनी त्यांच्याकडील कोयत्याने फिर्यदिस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर वार केला त्यावेळी सदर ठिकाणी गर्दी जमली असता आरोपींनी त्याच्या हातातील कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली व जमलेल्या लोकांना शिवीगाळ करून निघून गेले म्हणून आरोपी विरुद्ध हडपसर पोलिस स्टेशन मध्ये गु. र.न.९५९/२०२४ भा. द.वी कलम ३०७,३२४,३२३,५०४,५०६,३४,४२७ सह कलम३७(१) १३५ मुंबई पोलिस कायदा सह ३,७, क्रिमिनल लॉ कायदा प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता

 सदर आरोपीच्या वतीने ॲड.पी. डी.खंडागळे यांनी जिल्हा व सत्र न्यायालय पुणे येथे जामीन मिळणं करिता जामीन अर्ज दाखल केला होता प्रतुत प्रकरणामध्ये आरोपीस केवळ संसायावरून अटक केली आहे असा युक्तिवाद आरोपीच्या वतीने केला असता सदर चां युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा सत्र न्यायधीश मे.टिकले साहेब यांनी आरोपींचा जामीन मंजूर केला.सदर प्रकरणामध्ये आरोपी तर्फे ॲड.पी. डी.खंडागळे , अँड. असीफ शेख. ॲड विकी साळवी ॲड संसारे यांनी काम पाहिले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button