नहीं रहे लिंगराज गोसावी…अनेक मित्रांनी दिली अश्रूंना वाट करून मोकळी…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
आज सकाळचीच गोष्ट जावेद गब्बर चा फोन वाजला आणि अघटीत बातमी कानी पडली तिकडून तो म्हणाला की,लिंगराज गोसावी यांनी आपली जीवन यात्रा मध्येच थांबवत जगाचा निरोप घेतला आहे,हे ऐकून माझे मन आपसूकच भूतकाळात गेले होते…
दिसताच क्षणी “जय राष्ट्रवादी” म्हणतच आमच्या बोलण्याला सुरुवात होई,लिंगराज यांचा बोलण्यातला हजर जबाबी पणा वाखाणण्या जोगा आणि तेवढाच नर्मविनोदी स्वभावाने माणसे गोळा करणारा माणूस म्हणून हि त्यांची ओळख…

तसे पहायला गेलं तर अनेक वर्षांनी ते आम्हाला सिनियर तरी सुध्दा बोलताना कुठे ते जाणवू द्यायचे नाहीत,आज त्यांच्यासाठी “भावपुर्ण श्रध्दांजली” चे चार शब्द लिहीत असताना मध्येच मनोज पोटे यांना कॉल करून खरेच लिंगराज आज आपल्यात नाहीत हे विचारताना सुध्दा मन दाटुन आलेल…
भुसार व्यापारी म्हणून हि ते अकलूज येथील लोकांच्या कायम स्मरणात राहतील…
नियती समोर कुणाचे काही चालत नाही हे आज पुन्हा एकदा सिध्द झाले,टाइम्स 9 परिवाराच्या वतीने लिंगराज गोसावी यांना भावपुर्ण श्रध्दांजली… ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिर शांती देओ…
💐💐💐💐💐💐💐



