माढा विधानसभा मतदार संघात “तुतारी” चीच हवा…

🎯 सुशीलकुमार शिंदे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात शरद पवार यांनी शिवतेजसिंह मोहिते पाटील यांना माढा विधानसभेच्या यशाचा दिला कानमंत्र…? सुत्रांची माहिती…
🎯 माढा लोकसभेच्या पार्श्व भूमीवर माढा विधानसभा हि “तुतारी” नेच गरजणार…
प्रतिनिधी,आमीर मोहोळकर,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
महाराष्ट्र विधी मंडळाच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत,याच अनुषंगाने सबंध महाराष्ट्र मात्र राजकीय पक्षांच्या “बंद” ने,आंदोलनाने गरजाय सुरुवात झालीय,हेवेदावे,डाव-प्रतीडाव सुरु आहेत…
कुणी “घरवापसी” च्या वेडात आहे तर कुणी आपली आमदारकी वाचवण्यासाठी प्रयत्नशील असाच केविलवाणा प्रयत्न करतायेत माढा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार बबनराव शिंदे…
बबनराव शिंदे हे आपले सुपुत्र रणजित शिंदे यांच्या साठी आग्रही भूमिकेत आहेत,तसे प्रयत्न त्यांनीं गेल्या महिनाभरात जवळ जवळ तीन वेळा केले असुन देशाचे नेते शरद पवार साहेब यांची भेट सुध्दा घेतली होती परंतु शरद पवार साहेब यांच्या सोबत झालेल्या बैठकीचा तपशील अद्याप हि बबनराव शिंदे यांनी जाहीर केलेला नसल्याने माढा विधानसभा मतदार संघातील जनतेने मात्र त्या बैठकीचा तपशील चांगलाच ओळखल्याने बबनराव शिंदे हे सध्या बॅक फूटवर गेलेले पहायला मिळत आहे…
शरद पवार साहेब यांच्या “त्या” बैठकी नंतर बबनराव शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे हे अकलूज मार्गे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या मीटिंग मध्ये सामील होताना हि दिसत आहेत…
शरद पवार साहेब यांच्या सह बबनराव शिंदे यांची झालेली “ती” बैठक आणि धनराज शिंदे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटा बरोबर घेतलेली फारकत बरेच काही सांगून जात असली तरी या मध्ये काही तरी राजकारण होणार असे सध्या तरी वाटत आहे…असो…

बबनराव शिंदे यांची माढा तालुक्यावर असणारी पकड सैल झाल्याचे दिसत असल्याने बबनराव शिंदे यांचा राजकीय “एरा” संपल्याचे हि जाणवत आहे,कारण नुसत्या साखर कारखानदारीच्या माध्यमातून राजकारण होतच नसते हे आता माढा तालुक्यातील जनता हि मान्य करताना दिसत आहे…
बबनराव शिंदे हे आपले पुतणे धनराज शिंदे यांना पुढे करुन जर राजकारण करत असतील तर आपले सुपुत्र रणजित शिंदे यांना घेऊन शरद पवार साहेब यांच्या भेटीने काय साध्य केले ते बबनराव शिंदे यांनी एकदाचे जाहीर करून टाकावे…
बबनराव शिंदे यांनी बहुतेक मिडास टच ची कथा वाचली नसेल आत्ताच्या घडीला सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटील यांच्या नावाचा ज्या उमेदवाराला “टच” असेल अगदी तोच उमेदवार माढा विधानसभा मतदार संघातून निवडून येणार असल्याचे हि आता जनतेतून बोलले जात आहे…
याचे ताजे उदाहरण पहायचे झाल्यास आपल्या शेजारील इंदापूर तालुक्याचे “सुत्र” सुध्दा सध्या कोण हलवतायेत ते पाहणे सुध्दा बबनराव शिंदे यांना फायद्याचे ठरणार आहे,इंदापूर चे माजी आमदार हर्षवर्धन पाटील साहेब लवकरच “तुतारी” फुंकतील अशी चिन्हें निर्माण झाली आहेत…
अशातच गेल्या रविवारी अकलूज येथे पार पडलेला सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या दिमाखदार सोहळ्यात दस्तुर खुद शरद पवार साहेबांनी माढा विधानसभा मतदार संघाचे प्रमुख दावेदार शिवतेजसिंह मोहिते पाटील यांना कानमंत्र दिल्याची चर्चा सुध्दा आता जोर धरू लागलीय…
गेली तीस वर्षे माढा तालुक्यातील जनतेनेला शिंदे आणि कंपनी यांनी नुसत्या साखर कारखानदारीच्या माध्यमातून वेड्यात काढून ठेवले आहे,आता मात्र माढा तालुक्यातील जनता सर्वांगीण विकासाच्या प्रतीक्षेत आहेत…
साखर कारखानदारीच्या माध्यमातून स्वकियांचाच विकास साधणाऱ्या शिंदे कंपनी वर माढा तालुक्यातील जनता या वेळी विश्वास ठेवतील का नाही हा प्रश्न देखील महत्वाचा होऊन बसला आहे…
या सगळ्या घटनांची गोळा बेरीज केल्यास शिवतेजसिंह मोहिते पाटील यांची स्वारी जोमात आहे तर माढा तालुक्याचा शिंदे गट मात्र हळु हळु कोमात जात असल्याचे हि जनतेतून बोलले जात आहे,शेवटी एक गोष्ट मात्र तंतोतंत खरी ठरणार आहे ती म्हणजे माढा लोकसभा सारखी माढा विधानसभा हि “तुतारी” नेच गरजणार…



