श्री कमला भवानी नवरात्र उत्सवाला 3 ऑक्टोबर पासून घटस्थापनेने सुरुवात

करमाळा प्रतिनिधी आलिम शेख
करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध अशा श्री कमला भवानी मंदिरामध्ये दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता घटस्थापना होऊन नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे यावेळी सर्व पुजारी मानकरी व पंच कमिटी सदस्य उपस्थित राहणार आहेत यावेळी घटस्थापना श्री राजेंद्र तुकाराम वाशिंबेकर विश्वस्त
सौ .राधिकाताई राजेंद्र वाशिंबेकर यांचे हस्ते होणार आहे

यावेळी बापूराव पुजारी दादासाहेब पुजारी रोहित पुजारी विजय पुजारी किसन सोरटे सचिन सोरटे मधुकर सोरटे भिकोबा सोरटे यांचे सह पुरोहित रविराज रविराज पुराणिक रंगनाथ पुराणिक मानकरी अभिषेक फुलारी शिवशंकर फुलारी बबन दिवटे लक्ष्मण हवालदार शिवाजी पकाले रमेश येळवणे ईश्वर पवार श्रीकांत गोमे शंकर पवार पद्माकर सूर्य पुजारी हनुमंत पवार राजेंद्र शिंदे नंदू जामदार इंताज शेख इत्यादी आपले सेवा देवीचरणी अर्पण करणार आहेत श्रीदेवीचा माळ ग्रामपंचायत ने गाव स्वच्छतेचे मोहीम राबवली असून सर्व भाविक भक्तांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केलेले आहेत

या उत्सवा दरम्यान साधारणतः पाच ते सहा लाख भाविक नऊ दहा दिवस देवीच्या दर्शनासाठी येत असतात या येणाऱ्या भाविकांसाठी उपवासाच्या फराळाची सोय अन्नछत्र मंडळामार्फत करण्यात आलेले आहे अशी माहिती सरपंच रेणुका सिद्धेश्वर सोरटे यांनी दिली आहे ग्रामपंचायत ने येणारे भाविकांच्या बालगोपाळांसाठी झुला पाळणे अशा विविध मनोरंजनाच्या खेळाचे आयोजन केलेले आहे यासाठी ची तयारी पूर्ण झालेली आहे नऊ दिवस विविध कार्यक्रम आयोजित केलेली आहे
यासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांना पाण्याची सोय करण्यात आली आहे श्री कमला भवानी मंदिराला मूळ स्वरूप देण्याचे मूळ काम नऊ महिन्यापासून चालू असून मंदिराला पुरातन स्वरूप आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत नवरात्र उत्सवानिमित्त सर्व मंदिर व मंदिर परिसर स्वच्छ करून घेण्यात आलेले आहे तसेच मंदिर परिसरातील भाग ग्रामपंचायत श्रीदेवीचा माळ यांच्याकडून स्वच्छता करण्यात आलेली आहे अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये नवरात्र उत्सव सुरू होत असल्याकारणाने भाविकांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे अशी माहिती मंदिर समिती अध्यक्ष सोमनाथ चिवटे व सचिव अनिल पाटील यांनी दिली आहे .



