महाराष्ट्र

गांजा मिश्रित मावा-गुटख्याच्या विळख्यात अकलूजच्या तरुण पिढीचे आयुष्य उद्ध्वस्त होताना दिसतंय…

🎯 अकलूज पोलिस प्रशासन आणि अन्न,औषध भेसळ प्रशासन याकडे लक्ष देईल का…?

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

अकलूज येथील काहीं पान शॉप आणि पान टपऱ्यांवरती तंबाखू,चुना आणि सुपारी यांच्या मिश्रणासहित गांजा मिश्रित पाणी माव्यामध्ये घालण्याचा एक घातक परिणाम करीत असल्याचं काही मावा प्रेमींकडून बोलले जात आहे,त्यानं होतं असं की एखाद्याने जर काय मावा खाल्ला तर त्यामध्ये गांजा मिश्रित पाणी असल्याने तो मावा प्रेमी पुन्हा पुन्हा त्याच पान शॉप वरती अथवा त्याच पान टपरी वरती मावा खाण्यास परत यावा या उद्देशाने गांजा मिश्रित पाणी या माव्यामध्ये घालण्याचा घातक असा डाव आखत आहे.अगदी काही दिवसांपूर्वीच युवा नेते तत्कालीन ग्रामपंचायत अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी अकलूज हे “मेडिकल हब” म्हणून ओळखले जात होते परंतु आत्ताच्या घडीला हेच अकलूज शहर आणि परिसर “गांजाचा हब” बनत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती…

वास्तविक पाहता अकलूज मधील काही पान शॉप अथवा पान टपऱ्यांवरती गांजा मिश्रित सिगारेट हे देखील मोठ्या प्रमाणात विकत असल्याचे निर्देशनास आले असून तरुण पिढीने या कडे जोरदार मोर्चा वळवल्याचे दिसून येत आहे,सबंध महाराष्ट्र मध्ये गुटखा बंदी असून देखील हा गुटखा सर्रासपणे महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या व्यवसायिकां जवळ येतोच कसा हे न ऊलगडणारे कोडे आहे…

महाराष्ट्र शासनाने गुटखा आणि मावा यांच्या विक्री,उत्पादन आणि साठवणुकीवर बंदी घातली असली तरी,हे तंबाखूजन्य पदार्थ आजही छुप्या मार्गाने सहज उपलब्ध होत असल्याने तरुण आणि शालेय मुले या व्यसनाच्या विळख्यात अडकून त्यांचे आयुष्य बरबाद होत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे…

मावा (तंबाखू,चुना,सुपारी आणि गांजायुक्त पाणी यांचा मिश्रण) गुटखा (तंबाखूयुक्त पान मसाला) यांचे व्यसन केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर तरुण पिढीच्या शैक्षणिक,आर्थिक आणि सामाजिक भविष्यासाठी मोठे आव्हान ठरले आहे.कमी वयातच हे व्यसन लागल्याने अनेक मुले-मुली मौखिक कर्करोग (Oral Cancer),’ओरल सबम्यूकस फायब्रोसिस’ (OSMF) आणि इतर गंभीर आजारांना बळी पडत आहेत…

👇 व्यसनाधीनतेची कारणे आणि परिणामांची साखळी👇

🎯सहज उपलब्धता आणि कमी किंमत
बंदी असूनही,पानटपरी आणि काही किरकोळ विक्रेत्यांकडून मावा आणि गुटखा चढ्या दराने पण सहज उपलब्ध होतो.त्याची कमी किंमत तरुणांना सहजपणे हे व्यसन सुरू करण्यास प्रवृत्त करते.

🎯समवयस्कांचा दबाव (Peer Pressure)
शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अनेक तरुण मित्र-मैत्रिणींच्या दबावाखाली किंवा त्यांच्यात मिसळण्यासाठी हे व्यसन सुरू करतात.सुरुवातीला ‘फक्त एकदा’ म्हणून केलेला प्रयोग कधी पूर्णपणे सवयीत बदलतो,हे त्यांनाही कळत नाही.

🎯आरोग्यावर गंभीर परिणाम
तज्ञांच्या मते मावा आणि गुटख्यामध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणारी रसायने (Carcinogens) मोठ्या प्रमाणात असतात.यामुळे तरुणांमध्ये तोंडाचा आणि गळ्याचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले आहे अनेक विद्यार्थ्यांचे दात आणि हिरड्या खराब होणे,भूक मंदावणे,वजन कमी होणे आणि सर्वात गंभीर म्हणजे तोंडाचे ऑपरेशन होण्याची वेळ आली आहे.

🎯शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान
व्यसनाच्या आहारी गेलेली मुले अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात, त्यांची एकाग्रता कमी होते,ज्यामुळे शैक्षणिक प्रगती थांबते. व्यसनासाठी लागणाऱ्या पैशांमुळे कुटुंबावर आर्थिक ताण येतो,तसेच गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यताही वाढते.उपाययोजनांची गरज या भयानक परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शासकीय यंत्रणा,पालक,शाळा आणि सामाजिक संस्था यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.

🎯 कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे
गांजा,मावा-गुटख्याच्या छुप्या विक्रीवर आणि साठवणुकीवर अन्न व औषध प्रशासन (FDA) तसेच अकलूज पोलिसांनी या विषयामध्ये लक्ष घालून संबंधित लोकांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे तसेच गुटखा मावा आणि काही तंबाखूजन्य पदार्थ महाराष्ट्रामधील आणणारे व्यापारी यांचे “आका” आहेत तरी कोण..? असे सर्वसामान्य जनतेतून बोललं जात आहे

🎯 जागृती मोहिम
शाळा-महाविद्यालयांमध्ये व्यसनाच्या गंभीर परिणामांविषयी विशेष जागृती कार्यक्रम आणि समुपदेशन सत्रे नियमितपणे आयोजित करणे गरजेचे आहे.

🎯 पालकांचे लक्ष
पालकांनी आपल्या मुलांच्या सवयी आणि वर्तणुकीकडे अधिक लक्ष देणे,तसेच त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधणे महत्त्वाचे आहे.मावा आणि गुटख्याच्या व्यसनाने तरुण पिढीचे आयुष्य विनाकारण धोक्यात आले आहे.वेळीच योग्य उपाययोजना न केल्यास या व्यसनाचा विळखा आणखी घट्ट होईल आणि भविष्यात एक निरोगी आणि सक्षम पिढी तयार करण्याचे स्वप्न अपूर्ण राहील,यात शंका नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button