महाराष्ट्र

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 60581बहिणींची नोंद

नोंदणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा शिवसेना करणार सत्कार

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत नाव नोंदणी करण्यात करमाळा तालुक्यातील आघाडी घेतली असून आत्तापर्यंत साठ हजार 581 महिलांची नोंद झाली असून ही नोंदणी करण्यास महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 400 अंगणवाडी सेविकांचा शिवसेना सत्कार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे करमाळा तालुका सदस्य महेश चिवटे यांनी दिली आहे

यापैकी 59 हजार 600 महिला मुख्यमंत्री लाडकी योजनेत समाविष्ट झाले असून यापैकी 42 हजार 300 महिलांच्या खात्यावर प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले आहेत

ही योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी तहसीलदार शिल्पाताई ठोकडे गटविकास अधिकारी मनोज राऊत प्रकल्प विकास अधिकारी आनंद शोभा अरुण जाधव
पर्यवेक्षिका सुजाता कांबळे करिष्मा देसले वंदना चोले
विस्तार अधिकारी संदीप रणदिवे यांनी विशेष परिश्रम घेतले

यासाठी तालुक्यातील 370 अंगणवाडी सेविका अहोरात्र नोंदणी करण्यासाठी घरोघरी फिरत होतं
या नोंदणी करण्यासाठी कोणत्याही महिले कडून एकही रुपया घेण्यात आला नाही

अत्यंत निस्वार्थीपणे मुख्यमंत्री लाडके योजना तळागाळापर्यंत पोहोचवणारे चे काम करणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविकाचा शिवसेनेच्या वतीने लवकरच सत्कार करण्यात येणार आहे

यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की लाडकी बहीण योजनेप्रमाणेच 65 वर्षावरील वृद्धांना वयश्री योजनेसाठी प्रत्येकी तीन हजार रुपये तात्काळ देण्यात येणार आहेत त्याची ही नोंदणी जोरात सुरू आहे ही नोंदणी अंगणवाडी सेविकाकडे केली तरी चालेल तसेच बांधकाम कामगारांना नोंदणी प्रक्रिया शिवसेना कार्यालयात सुरू आहे

देशा अंतर्गत तीर्थयात्रा देवदर्शन करण्यासाठी वृद्ध व्यक्तींना तीस हजार रुपये अनुदान असून त्याचेही फॉर्म भरण्याची काम सुरू आहे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या या योजनेचा लाभ सर्व तालुक्यातील जनतेने घ्यावा व जिथे अडचणी तेथे शिवसेना कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button