शहर

आदिवासी महिलेला शिवीगाळ प्रकरणी अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये डहाणू पोलीस ठाण्यात परेश भरवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

डहाणू तालुक्यातील सावटा येथील एका महिलेला एका बिगर आदिवासी व्यक्तीकडून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 22 सप्टेंबर 2024 रोजी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावटा येथील रमेश डोंगरकर यांच्या मालकीच्या जमिनीत परेश भरवाड यांनी घर बांधले असून त्या जागेवरून दोनही गटांमध्ये काही वर्षांपासून वाद सुरू आहे. दरम्यान 9 ऑगस्ट रोजी 2024 रमेश डोंगरकर यांची पत्नी सुनीता डोंगरकर रस्त्याने जात असताना आरोपी परेश भरवाड यांनी तिला जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याविषयी डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून चौकशी अंती आरोपीवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अंकिता कणसे आणि डहाणू पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button