शहर

पालघर जिल्ह्यातील सफाळे आगरवाडी येथे रोजगार मेळावा संपन्न

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

वर्तमान काळातील महत्वाची सामाजिक समस्या म्हणजे तरुणाईतील नशेचे वाढते प्रमाण नशा सोडवणे हे एक आव्हानात्मक काम आहे आणि हेच काम “सपोर्ट” संस्था गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत प्रमाणिकपणे करत असल्याचे दिसून येत आहे.असे गौरवद्गार पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी काढले.

आगरवाडी येथील “सपोर्ट” संस्थेत आयोजित रोजगार मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.तर सपोर्ट संस्थेचे संचालक राजेश नैनकवाल या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते.

सपोर्ट कौशल्य विकास व पुनर्वसन केंद्र,जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्र आणि केळवे सागरी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी हा रोजगार मेळाव्या सपोर्ट कौशल्य विकास केंद्र आगरवाडी (सफाळे) येथे आयोजित करण्यात आला होता. या आयोजित रोजगार मेळाव्यात 10 पेक्षा अधिक नामवंत कंपन्यांनी सहभाग घेतला होता तर या नामवंत कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी 300 हून अधिक युवा तरुण-तरुणींनी उपस्थित होते.

याप्रसंगी पालघर उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर, केळवे सागरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी, यंग प्रोफेशनल कौशल्य विकास विभाग श्वेता निखरा, बाल न्याय मंडळ सदस्य डॉ. मनिषा नैनकवाल, कौशल्य विकास विभाग अधिकारी – नरेंद्र शिरसाट, आगरवाडी सरपंच, सफाळे सरपंच राजेश म्हात्रे,समीर सुर्वे, जनार्दन पाटील, कल्पेश पाटील, शफी अहमद, अशोक तिकम, रवी पिले, एजाज खान, सागर जाधव, गुरव यांच्यासह जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच व सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button