माळीनगर आय.टी.आयचा निकाल ९३.७९ टक्के
प्रतिनिधी- रियाज मुलाणी
मो 9921500780
डि.जी.टी नवी दिल्ली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या अखिल भारतीय व्यवसाय नियमीत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत औद्योगिक प्रशिक्षण संस्था माळीनगर (ता. माळशिरस) येथील संस्थेतील प्रशिक्षणार्थीनी उत्तुंग यश संपादन केले आहे.यामध्ये इलेक्ट्रिशिअन, फिटर,मेकॅनिक मोटर व्हेईकल, मेकॅनिक डिझेल, व वेल्डर या व्यवसायातील अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाचा एकूण निकाल ९३.७९ टक्के लागला आहे.
डि.जी.टी नवी दिल्ली यांच्या वतीने जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये शिल्प कारागिर योजनेअंतर्गत ही परीक्षा घेण्यात आली होती. प्रात्यक्षिक व कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) पध्दतीने झालेल्या या परीक्षेस अंतिम वर्ष व्यवसाय परीक्षेस एकूण १४७ प्रशिक्षणार्थी बसले होते यापैकी १३६ प्रशिक्षणार्थी चांगल्या गुणांनी उतीर्ण झाले आहेत.
या परीक्षेत विश्वजित माने याने ९३.३३ टक्के (इलेक्ट्रिशिअन), रणजित इंगळे याने ९०.३३ टक्के (मेकॅनिक मोटर व्हेईकल), महादेव हजारे याने ७९ टक्के (मेकॅनिक डिझेल), वैभव करमारे याने ७६.१७ टक्के (फिटर), रोहित पाटील याने ७४.१७ टक्के (वेल्डर), यांनी व्यवसायनिहाय प्रथम क्रमांकाने बाजी मारली आहे.
या यशाबद्दल दि सासवड माळी शिक्षण संस्थेचे चेअरमन राजेंद्र गिरमे, व्हा. चेअरमन नितीन इनामके, सचिव अजय गिरमे, खजिनदार ज्योतीताई लांडगे, संचालक अशोकराव गिरमे,अनिल रासकर,ऍड.सचीन बधे,रत्नदिप बोरावके,डॉ. अविनाश जाधव,प्रकाश गिरमे,पृथ्वीराज भोंगळे,कल्पेश पांढरे, लिनाताई गिरमे,दिलीप इनामके व विश्वस्त विजयकांत कुदळे,अरविंद जाधव,चंद्रकांत जगताप, सूर्यकांत बोरावके, कोअर्डिनेटर राजीव देवकर तसेच प्राचार्य विराज बधे व सर्व शिक्षक कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.