महाराष्ट्र

दि मॉडेल विविधांगी प्रशालेतीलविद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी

प्रतिनिधी… रियाज मुलाणी
मो 9921500780

माळीनगर येथील दि मॉडेल विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय,माळीनगर येथे डॉ.नाळे मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक बारामती यांचे वतीने घेण्यात आलेल्या मोफत दंतचिकित्सा शिबिरात प्रशालेतील जवळपास ६०० विद्यार्थी व शिक्षक यांची नुकतीच मोफत दंत तपासणी करण्यात आली.

दि मॉडेल विविधांगी प्रशालेच्या माजी विद्यार्थीनी व रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन,तळेगाव दाभाडे पुणे येथील माजी शिक्षिका स्नेहलताई दत्तात्रय बाळसराफ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरुवारी येथील दि मॉडेल विविधांगी प्रशालेत इंडियन डेंटल असोसिएशन बारामती,आधार मेडिकल फाउंडेशन बारामती,आणि डॉ.नाळे मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक बारामती यांचे वतीने डॉ.केतकी नाळे यांनी या मोफत दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबाराचे उदघाटन प्राचार्य दत्तात्रय बाळसराफ,स्नेहलताई बाळसराफ,सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे सचिव अजय गिरमे, खजिनदार ज्योतीताई लांडगे, संचालक कल्पेश पांढरे यांचे हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.यावेळी अजित गिरमे,रवींद्र देशपांडे,प्रदीप नागटिळक,सतीश देशमाने,डॉ.स्नेहा टिळेकर,नेहा भोपळे,आकांक्षा बाजकर,आकाश जगताप तसेच प्रशालेचे प्राचार्य कलाप्पा बिराजदार,उपप्राचार्य रितेश पांढरे,पर्यवेक्षक कल्याण कापरे,बाळासाहेब सोनवणे आदी शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या दंतचिकित्सा शिबिराचे उद्घाटनप्रसंगी स्नेहलताई बाळसराफ यांच्या वाढदिवसानिमित्त दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी माळीनगर या संस्थेच्या वतीने त्यांचा फेटा बांधून,शाल व बुके देऊन सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

प्राचार्य दत्तात्रय बाळसराफ,स्नेहलताई बाळसराफ, डॉ.केतकी नाळे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बांदल यांनी तर नवनाथ गायकवाड यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button