आमदार संजय मामा शिंदे यांच्या म्हैसगाव येथील श्री विठ्ठल साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावे काढले 28 कोटी रुपयाचे कर्ज,माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा खळबळजनक आरोप

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
आमदार संजयमामा शिंदे यांच्या म्हैसगाव येथील श्री विठ्ठल कारखान्याने शेतकऱ्यांना पूर्ण माहिती न देता विना परवानगी त्यांचे नावे काढलेल्या कर्ज प्रकरणात गैरव्यावहारा बरोबरच प्रचंड भ्रष्टाचार झाला असून नुकतेच २८ कोटी रुपयांचे कर्ज प्रकरण उजेडात आले असल्याचा आरोप माजी आमदार नारायण पाटील यांनी केला आहे.
याबाबत अधिक शंका व्यक्त करताना पाटील यांनी सांगितले की विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांचेशी संबंधित साखर कारखान्याने शेतकऱ्यांना खत आणि पिकावरील औषधं देतो असे सांगून त्यांचेकडून आधार सारखी कागदपत्रे छायाकित प्रति मध्ये घेऊन पुढे या कागदपत्रांचा वापर कारखान्याने कर्ज प्रकरणात केला. शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे या कारणास्तव कोट्यावधी रुपयांची कर्ज प्रकरणे अनेक बँकामध्ये करून शेतकऱ्यांच्या परस्पर रक्कम उचलली व ती वापरली.
विशेष म्हणजे याचा थोडाही थांगपत्ता शेतकऱ्यांना लागू न देण्याचा कट कारखान्याने यशस्वी पणे आखाला व राबवला. परंतु सदर कर्ज व त्यावरील व्याज थकल्याने बँक अडचणीत आली आणि वसुली साठी बँकेने थेट शेतकऱ्यांना नोटीस पाठवाल्या. यानंतर कुठे शेतकऱ्यांना माहिती झाले की आपल्या नावावर आमदार संजय मामा शिंदे यांच्या कारखान्याने कर्ज काढले आणि याचा एक रुपयाही प्रत्यक्ष आपल्या हातात पडला नाही. परंतु बँक मात्र आता हे कर्ज आपल्याकडून वसुल करणार आहे.

या अशा अनेक बँकेच्या हजारो कोटी रुपयांची कर्ज प्रकरणे आणि यात गुंतलेले हजारो शेतकरी याबाबत काही आंदोलने झाली. पण आता मागील काही दिवसात एका बँकेने परत एकदा शेतकऱ्यांना कोर्टात खेचले असून समन्स आल्यावरच शेतकऱ्यांना याबाबत माहिती मिळाल्याचे समजते. सन २०१५-१६ मध्ये पीक कर्ज म्हणून शेतकऱ्यांच्या नावावर जवळपास २८ कोटी रुपये कर्ज विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांच्याशी संबंधित कारखान्याने काढले असून शेतकऱ्यांना कर्ज फेडीच्या नोटीस आल्या असल्याचे समजते.
या प्रकरणात कमीत कमी ९०० शेतकरी विनाकारण रक्कम न वापरता अडकले असून याबाबत आता उद्या १० जुलै रोजी माढा न्यायालयात सुनावणी आहे. सदर प्रकरणीं आय बी डि बी आय बँकेने न्यायालयात दावा दाखल केला आहे.सर्व बाबी उघड पडल्यास यात लाखो शेतकरी अडकले असल्याची शक्यता नाकारता येणार नाही.आमदार संजय मामा शिंदे यांनी या प्रकरणाचा तपशील जनते समोर द्यावा.
एक जबादार लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी याबाबत पूर्ण माहिती जनतेला दिली पाहिजे. अन्यथा अन्यायग्रस्त आणि सिबिल खराब झाल्याने इतर कोणतीही बँक आता या शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करत नाही अशा शेतकऱ्यांच्या बाजूने वेळ पडली तर आपण न्यातलयीन लढाईची तयारी ठेवली असल्याचा सूचक इशारा माजी आमदार नारायण पाटील यांनी दिला आहे.



