सोलापूर जिल्हा शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्याच विचारांचा… खा धैर्यशिल मोहिते पाटील

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
9890299499
1999 च्या राष्ट्रवादी स्थापने नंतर पुणे जिल्ह्यापेक्षा जास्त आमदार असलेला जिल्हा म्हणून सबंध महाराष्ट्रात ओळख असलेल्या आपल्या सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या वेळेस हि शरद पवार साहेब आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्याच विचारांचे आमदार निवडून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन माढा लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केले ते खंडाळी येथील मुस्लिम समाज बांधवांच्या जामा मशिदीच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी बोलत होते…

पुढे बोलताना ते असे हि म्हणाले की खासदार कीच्या निवडणूकीत खंडाळी येथील ग्रामस्थांनी आणि सबंध मुस्लिम समाज बांधवांनी जे प्रेम मोहिते पाटील घराण्या बद्दल व्यक्त केले ते असेच कायम रहाओ…
कार्यक्रमा साठी आवर्जुन उपस्थित असलेले स म शं मोहिते पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक उत्तमराव जानकर यांच्या कडे पाहत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जानकर यांना आमदार करण्यासाठी हि सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे हि ते म्हणाले…
सरते शेवटी “दुआ में याद रखना” म्हणत आलेल्या सर्व उपस्थितांची मने जिंकली…
या वेळी मुस्लिम समाजाचे नेते ॲड.वजीर शेख,खंडाळी मुस्लिम जमातीचे अध्यक्ष इकबालभाई शेख,खंडाळी गावचे सरपंच बाबुराव पताळे,हरिदास भोसले,उपसरपंच विठ्ठलराव पताळे,पोलिस पाटील सुभाष खटके,खंडाळी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आणि मुस्लिम समाजाचे प्रमुख मौलाना व असंख्य हिंदू-मुस्लिम बांधव उपस्थित होते…

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बागवान समाजाचे “समाज भूषण” भैय्या माढेकर यांनी केले…
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खंडाळी येथील सर्व ग्रामस्थांनी प्रयत्न केले…



