माढा तालुक्यातील युवकांमध्ये शिवबाबांची क्रेझ वाढतेय…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
लोकसभा निवडणुकीत शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचा माढा तालुक्याशी वाढलेला स्नेह सबंध जस जशी विधानसभा निवडणुक जवळ येत आहे तस् तसे ते अधिक प्रमाणात घट्ट होत चालल्याचे दिसून येत आहे…
माढा तालुक्यातील जनतेचे संबंध हे सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांच्या पासूनचे… लोकसभा निवडणुकीत शिवबाबा यांनी केलेलं युवक संघटन,राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाची त्यांची जिद्द,चिकाटी अशा किती तरी बाबी वर काम करण्याची शिवबाबा यांची हातोटी या मुळे माढा तालुक्यातील युवकांमध्ये त्यांची क्रेझ वाढत आहे हे कुणी नाकारु शकत नाही…
त्याचे झाले असे की,शिवबाबा हे त्यांचा नियोजित माढा तालुक्याचा दौरा करुन टेंभुर्णी मार्गे अकलूज रोड येथून पुढील दौऱ्यासाठी येत असताना काहीं अंतरावरच गोविंद आश्रम आहे त्या गोविंद आश्रमा जवळ थांबलेल्या काही युवक मित्रांनी समोरून येणारी गाडी शिवबाबांचीच आहे म्हणून गाडीला हाथ करून थांबवली आणि आम्हा सर्वांना तुमच्या बरोबर फोटो काढायचा आहे अशी विनंती केली असता शिवबाबांनी कसलाही विचार न करता पुढील दौऱ्यास जायला उशीर होत असताना सुध्दा केवळ त्या युवक मित्रांच्या आग्रहास्तव गाडीतून उतरून फोटो काढले…



