शहर

संतोष जनाठे यांचा नेतृत्वाखाली पालघर भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांसाठी चारोटी टोल अधिकाऱ्यांना दिली भेट

टाईम्स नाईन न्यूज नेटवर्क उपसंपादक विजय घरत
भ्रमणध्वनी क्रमांक- 7030516640

पालघर जिल्ह्यातील घोळ गावातील नागरिकांचे चारोटी टोल नाका प्रशासनाकडून अनेक वर्षा पासून विविध मागण्या प्रलंबित आहेत.

या मागण्यासाठी सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी पालघर विधानसभा निवडणूक प्रमुख संतोष जनाठे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे शिष्ठ मंडळ यांनी टोल नाक्याला भेट दिली. यावेळी येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून घोळ गावात बंद असलेला लाईट टॉवर चालू करणे, गावात येण्या जाण्यासाठी सर्विस रस्ता करून देणे, गावातील मुलांना टोल नाक्यावर कामावर घेण्यात यावे, व दोन्ही रस्त्याच्या मध्यभागी डिव्हायडर पत्रा लावणे,बोगद्यांमध्ये लाईट लावणे तसेच टोल नाक्यावरील अमूल दुकान बंद करणे व बंद असलेले वजन काटे काढून टाकावेत अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या

यावेळी शैलेश घारपुरे,भरत प्रजापती,सरपंच सुनीता कामडी, सदस्य सुदाम कदम,सदस्य वैशाली तांडेल,जयेश धांगडा,विजय कदम,अविनाश धांगडा,सुधीर धांगडा,सुरेश कदम,महेश चंपानेरकर व घोळ गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button