लालपरीचा 75 वा वर्धापन दिन अकलूज आगारा तर्फे विशेषत्वाने साजरा

उपसंपादक — हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
अकलूज बस स्थानकावर प्रवाशांचे स्वागत सत्कारासह मिठाई वाटपाने.लालपरी चा वाढदिवस केक शालेय लहान मुलीच्या हस्ते कापण्याची अभिनव कल्पना साकार.
अकलूज आगारास मे महिन्याचे अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतील 32 लाख 74 हजार रुपये तर महिला सन्मान योजनेतील 72 लाख 17 हजार रुपये रक्कम महाराष्ट्र शासनाकडून मिळाले : आगार व्यवस्थापक शिंदे.

प्रवाशांच्या जिव्हाळ्याशी निगडित असलेल्या लालपरीचा 75 वा वर्धापन दिन अकलूज आगाराच्यावतीने विशेषत्वाने आज साजरा करण्यात आला. या वर्धापन दिन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, अकलूज नगर परिषदेचे नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी पेठकर, सहाय्यक वाहतूक अधीक्षक सौ. रेशमा पंडितराव कापसे (पालक अधिकारी अकलूज आगार), माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे(संस्थापक संपादक अकलूज वैभव, वृत्त एकसत्ता, aklujvaibhav.in), ज्येष्ठ पत्रकार कृष्णा लावंड, ज्येष्ठ पत्रकार संतोष भोसले, ज्येष्ठ फोटोग्राफर, पत्रकार संजय लोहकरे उपस्थित होते.
प्रारंभी अकलूज आगार व्यवस्थापक प्रमोद रघुनाथ शिंदे यांनी प्रास्ताविकाद्वारे लाल परी च्या जन्मापासून 75 वर्षाच्या कालखंडाचा लेखाजोखा सविस्तरपणे मांडला. त्याचबरोबर शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवास योजना, महिला सन्मान प्रवास योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत पास योजना, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान योजना या प्रवाशांच्या हितोपयोगी महत्वपूर्ण योजनांबाबत सविस्तर माहिती सांगितली.

स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान अंतर्गत आवश्यकते सर्व सहकार्य आणि मदत अकलूज नगर परिषदे च्या वतीने पुरविण्यात येईल असे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी सांगितले. याप्रसंगी प्रवाशांच्या वतीने मगर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी वयोवृद्ध प्रवासी दांपत्य कुलथे यांचा सन्मान प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आला. या निमित्ताने अकलूजचे नवीन बस स्थानक हे लग्न घरासारखे स्वच्छ सुंदर सुशोभित करण्यात आलेले होते.
स्थानकाचा दर्शनी भाग अति भव्य आकर्षक रांगोळीने सजलेला, स्थानकात जागोजागी केळीचे खुंट, नारळाच्या झावळ्या, आंबा वृक्षाच्या पानांचे तोरण, जागोजागी विविध रोपांच्या कुंड्या, रंगीबेरंगी पताका, झुरमुळ्या, कार्यक्रम प्रसंगी प्रवाशांसाठी खास खुर्च्यांची मांडणी असा जंगी थाट अकलूज आगार व्यवस्थापक प्रमोद रघुनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी कर्मचारी यांनी लोक सहभागातून केला.

वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी वरील सर्व मान्यवरांसह अकलूज आगारातील सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक अनिरुद्ध शशिकांत कुलकर्णी, वाहतूक निरीक्षक चेतन नंदकुमार सोनलकर, आगार लेखाकर सौ. लता शंकरलाल खबाणे, वरिष्ठ लिपिक सौ. वंदना सोमनाथ वाघे,वाहक सौ. रुक्मिणी रेवण साबळे , वरिष्ठ लिपिक उदय गणपत दुपडे, विजय गणपत रणदिवे, अभिमन्यू अर्जुन वाघमारे, राजीव विजय गोसावी, विजय विष्णुपंत लंगोटे, अनिल भगवान गायकवाड, कांतीलाल मारुती मदने, संजय महादेव पिसे, संजय दत्तात्रय कुलथे, उत्तम विश्वनाथ भोसले, प्रशांत कोथमिरे, सामाजिक कार्यकर्ते गरीबदास सिद्धार्थ नामदेव गायकवाड, वृत्तपत्र विक्रेते महेश कुलकर्णी यांचे सह असंख्य प्रवासी, विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होत्या.



